Sai Tamhankarची बॉयफ्रेंडसोबत सिक्रेट मुव्ही डेट?, फोटोतून झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 01:36 PM2022-01-17T13:36:38+5:302022-01-17T13:36:59+5:30

सई ताम्हणकर (Sai Tamhankar)च्या इंस्टाग्रामवरील लेटेस्ट पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमधून तिने तिच्या बॉयफ्रेंडबद्दलचा खुलासा केला आहे.

Secret movie date with Sai Tamhankar's boyfriend? | Sai Tamhankarची बॉयफ्रेंडसोबत सिक्रेट मुव्ही डेट?, फोटोतून झाला खुलासा

Sai Tamhankarची बॉयफ्रेंडसोबत सिक्रेट मुव्ही डेट?, फोटोतून झाला खुलासा

Next

कलाकारांची चाहत्यांमध्ये खूप क्रेझ असते आणि त्यांना त्यांच्या आवडत्या कलाकाराची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता असते. तसेच फॅन्सना कलाकारांच्या खासगी आयुष्यात काय चालले आहे, हे जाणून घेण्यासाठी इंटरेस्टेड असतात. अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar)चा खूप फॅन फॉलोव्हिंग आहे आणि ती बऱ्याचदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. दरम्यान सई ताम्हणकरच्या इंस्टाग्रामवरील लेटेस्ट पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमधून तिने तिच्या बॉयफ्रेंडबद्दलचा खुलासा केला आहे. 

सई ताम्हणकर हिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती गाडीच्या बोनेटवर बसलेली दिसते आहे. तिने हा फोटो शेअर करत लिहिले की, मुव्ही नाईट माझ्या कल्पनेतील बॉयफ्रेंडसोबत. ओह ८३ सिनेमा पाहताना तो रडला. सई ताम्हणकर ड्राइव्ह इन थिएटरमध्ये ८३ हा चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. तिच्या पोस्टवरील कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 


सई ताम्हणकर हिच्या या पोस्टवर अभिनेत्री गौरी नलावडेने कमेंट केली की, तो रडला? मला तो आधीपासून आवडतो. तर अभिनेता आदिनाथ कोठारेने इमोजी शेअर केली आहे. एका युजरने म्हटले की, मी तुझा व्हॉलेंटियर आणि बॉयफ्रेंड बनायला तयार आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, कल्पनेतील प्रियकर ठीक आहे. पण खऱ्या आयुष्यात हॅण्डसम बॉयफ्रेंड का नाही आहे? जे काही तू करते ते छान करते. 

Web Title: Secret movie date with Sai Tamhankar's boyfriend?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app