This is the Secret of Amrita Khanvilkar and Himanshu Malhotra relationship | अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्राच्या नात्याचे हे आहे Secret
अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्राच्या नात्याचे हे आहे Secret

मराठी ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकर आणि चार्मिंग हिंदी अभिनेता हिमांशु मल्होत्रा या सुपरहिट जोडीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. 'नच बलिये' गाजवणाऱ्या या जोडीने नुकताच आपल्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला आहे. २४ जानेवारी २०१४ ला विवाहबद्ध झालेल्या या जोडीने आपल्या सुखी संसाराचे गुपित सोशल नेटवर्किंग साइटमार्फत चाहत्यांपर्यंत पोहचवल्या. त्यासाठी खास एक दिवस आधी अमृताने हिमांशू बरोबर लाईव्ह येत, लोकांशी गप्पा मारल्या. या गप्पांमध्ये दोघांनी एकमेकांच्या अनेक मजेशीर आठवणी लोकांना सांगितल्या. तब्बल  १५ वर्ष एकत्र असलेली ही जोडी आजही नव्याने प्रेमात पडल्यासारखी भासते. 


"आजपर्यंत हिमांशुने मला सांभाळून घेतले आहे, तो एक चांगला मार्गदर्शक असून त्याने दिलेले सल्ले आणि मतं माझ्या फायद्यासाठीच असतात." असं अमृता आपल्या पतीचे गुणगान गाते. तर हिमांशुने १५ वर्षापूर्वी एका हिंदी रिअॅलिटी शोमध्ये अमृता सोबतच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले.
'मेड फॉर इच अदर' कपल  अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा २४ जानेवारी २०१५ला  रेशीमगाठीत अडकले. त्यांच्या लग्नाला आता चार वर्ष पूर्ण झाली आहेत.अमृता ही मराठी आणि हिमांशू हा पंजाबी असल्यामुळे 'पंजाबी-मराठी' अशा दोन्ही पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला होता.यांच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. नव वधुच्या वेषात सजलेली नवी नवरी अमृता लग्नात अतिशय सुंदर दिसत होती.अमृता आणि हिमांशुची ओळख 'इंडियाज सिनेस्टार की खोज' सेटवरच या दोघांची  लव्हस्टोरी सुरू झाली होती. भेटल्यापासून या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.जवळपास १० वर्षे दोघेही एकमेकांना डेट करत होते. दोघांचीही चांगली केमिस्ट्री जमली होती.१० वर्ष डेट केल्यानंतर दोघांनीही विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. अमृताचा पती हिमांशु मल्होत्रा हा हिंदी टी.व्ही सृष्टीत काम करतो तर अमृता आज मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे.तसेच इंडस्ट्रीत अमृता आणि हिमांशु दोघांनाही एक परफेक्ट कपल म्हणून पाहिले जाते.

Web Title: This is the Secret of Amrita Khanvilkar and Himanshu Malhotra relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.