काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सायली देवधर लग्नाच्या बंधनात अडकली आहे. सायलीचा लग्नातील फोटो अभिनेत्री प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यानंतर सायलीने आता स्वत: लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. सायली देवधर हा मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीवरील लोकप्रिय चेहरा आहे. 'लेक माझी लाडकी', 'जुळून येती रेशीमगाठी' सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.


सायलीने शेअर केलेल्या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे. एका फोटोत तिने सायलीने साऊथ इंडियन लूकमधील हेअर स्टाईल केली आहे. सायली आणि गौरवच्या फोटोंवर फॅन्सनी लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 


 गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सायलीचा नवरा संगीतकार आणि गायक गौरव बुरसेशी साखरपुडा केला होता. सायलीने पुण्यातील अभिनव कला केंद्र या कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे. पुण्यातील एका ग्रुपसोबत नाटक केले आहे. सायली सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.

Web Title: Sayali deodhar share her wedding pictures on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.