Sayaji Shinde is a true Marathi superstar, lives a simple life | सयाजी शिंदेच खरा मराठी मातीतला सुपरस्टार,जगतात साधे पद्धतीने जीवन

सयाजी शिंदेच खरा मराठी मातीतला सुपरस्टार,जगतात साधे पद्धतीने जीवन

सेलिब्रेटी नेहमीच त्यांच्या महागड्या लाईफस्टाइलमुळे चर्चेत असतात.मात्र असेही काही कलाकार आहेत. ज्यांनी अफाट यश मिळवलं असलं तरी  त्यांचे  पाय आजही जमिनीवरच आहेत.अशाच कलाकारांपैकी एक अभिनेता ज्याला पाहून प्रत्येकाला वाटतं मराठी मातीतला सुपरस्टार सयाजी शिंदे.त्यांचे राहणीमान, वागणं यातील साधेपणा कायम आहे.आजही  सामान्य आयुष्य जगणेच पसंत करतात.


सयाजी शिंदे यांचे वृक्षप्रेम सर्वश्रूत आहे. यापूर्वीही त्यांनी वृक्ष लागवडीबाबत अनेक उपक्रम घेतले आहेत. झाडांचे वाढदिवस साजरे व्हायला हवेत व प्रत्येक गाव, तालुक्यातील सर्वात जुनी झाडे हेच त्या त्या भागातील आपले सेलिब्रेटी आहेत, आईनंतर वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देऊन जगवतात, त्यामुळे आपण सर्वांनी प्रत्येकी पाच झाडे तरी लावून वाढवली पाहिजेत. प्रत्येक शाळेत, संस्थेत वृक्ष बँक सुरू व्हावी.

शाळा, कॉलेजच्या अभ्यासक्रमात पर्यावरण विषयाला महत्त्व आले पाहिजे. झाडांचे वाढदिवस साजरे व्हायला हवेत. गेली दोनशे, तीनशे वर्षे आपल्या अनेक पिढ्यांना ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचे आपण ऋणी राहिले पाहिजे. धोरणकर्त्यांनी आता पर्यावरणाची हानी न करणारी धोरणे आखली पाहिजेत. विचार सगळे कपाटात बंद आहेत. आता प्रत्येकाने कृती करण्यास सुरुवात करायला हवी अशाप्रकारे आवाहन सयाजी शिंदे नेहमीच करताना दिसतात. 


ऑक्सिजनचे महत्त्व कोरोनामुळे लोकांना कळाले 

कोरोनाच्या काळात लोकांना ऑक्सिजनचे महत्त्व कळले. याची कमतरता जाणवू लागल्याने काय स्थिती होते, याची जाणीव झाली. झाडांच्या माध्यमातून मोफत मिळणाऱ्या आणि पैसे देऊनही न मिळणाऱ्या ऑक्सिजनबाबत सर्वांचेच डोळे उघडले. पण, तोपर्यंत डोळे पांढरे होण्याची वेळ अनेकांवर आली. कितीही पैसा आणि सुखसोयी असल्या तरी माणसाला शांती आणि समाधान हवे असते ते विकत मिळत नाही. पण झाडाखाली बसला तर या दोन्ही गोष्टी मिळतात. कोट्यवधी रुपयांच्या गाडीत बसल्यानंतरही जेव्हा गाडीबाहेर उतरतो, त्यावेळी आपण गाडीही झाडाखाली लावायला सांगतो. मग पैसा महत्त्वाचा की झाड?, असा सवालही शिंदे यांनी विचारला आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sayaji Shinde is a true Marathi superstar, lives a simple life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.