संस्कृती बालगुडेचं सोज्वळ सौंदर्यही करेल तुम्हाला घायाळ, SEE PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 07:12 PM2021-02-23T19:12:56+5:302021-02-23T19:16:39+5:30

बऱ्याचदा संस्कृतीला सोशल मीडियावर तिच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत विचारणा होत असते. तिच्या ऑन स्क्रीन लूकप्रमाणे ऑफ स्क्रीन लूकलाही रसिकांची पसंती मिळते.आता पुन्हा एक फोटो संस्कृतीने शेअर केला आहे.

Sanskruti Balgude’s stunning saree look, SEE PHOTO | संस्कृती बालगुडेचं सोज्वळ सौंदर्यही करेल तुम्हाला घायाळ, SEE PHOTO

संस्कृती बालगुडेचं सोज्वळ सौंदर्यही करेल तुम्हाला घायाळ, SEE PHOTO

Next

सोशल मीडियावर बॉलिवूड असो किंवा मग मराठी चित्रपटसृष्टीतील सगळेच कलाकार खूप अॅक्टीव्ह असतात.यांत सतत अॅक्टीव्ह असणारी मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिचे वेगवेगळे अंदाजातील फोटो शेअर करत असते. आपल्या जीवनातील विविध गोष्टी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी शेअर करते. बऱ्याचदा संस्कृतीला सोशल मीडियावर तिच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत विचारणा होत असते. तिच्या ऑन स्क्रीन लूकप्रमाणे ऑफ स्क्रीन लूकलाही रसिकांची पसंती मिळते.आता पुन्हा एक फोटो संस्कृतीने शेअर केला आहे.

नेहमीच चाहते अभिनेत्रींचा हॉट अवतार पाहून घायाळ होतात असे चित्र पाहायला मिळतं.मात्र संस्कृतीचा हा  फोटो पाहून  चाहत्यांना घायाळ करण्यासाठी केवळ हॉट लूकच गरजेचा असतो असे नाही.आपल्या सोज्वळ सौंदर्यानेही चाहत्यांना घायाळ करू शकतात हेच संस्कृतीच्या या फोटोने सिध्द केल्याचे पाहायला मिळत आहे.

 

संस्कृतीने सोशल मीडियावर हा फोटो अपलोड करताच तिच्या चाहत्यांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. तेसच हा फोटो शेअर करतेवेळी  खास कॅप्शनही दिली आहे. संस्कृतीने साडी परिधान केली असून कपाळावर मांगटिका असा साज असलेला  या लूकची रसिकांनाही चांगलीच भुरळ पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येकाची आपली वेगळी स्टाइल असते.अगदी त्याचप्रमाणे संस्कृतीची एक वेगळी स्टाइल आहे.त्यामुळे तिच्या या लूकची चाहत्यांनाही चांगलीच भुरळ पडत असल्याचे पाहायला मिळते आहे.

कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचं कसब अंगी असलेल्या अभिनेत्री संस्कृती बागरुडेकडे पाहिले जाते हिने आजवर बऱ्याच अवघड भूमिकाही अगदी सोप्या पद्धतीने सादर करीत रसिकांची मनं जिंकली आहेत.  भारंभार सिनेमा स्वीकारायचे नसून सिलेक्टिव्ह राहायला संस्कृतीला आवडते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sanskruti Balgude’s stunning saree look, SEE PHOTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app