Sanskriti Balgude says - hold my hand, look glamorous in the video | संस्कृती बालगुडे म्हणतेय - 'धरला माझा हात', जाणून घ्या काय आहे ही भानगड

संस्कृती बालगुडे म्हणतेय - 'धरला माझा हात', जाणून घ्या काय आहे ही भानगड

अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. याशिवाय ती या माध्यमातून तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ आणि काही फोटो शेअर केले आहेत. या माध्यमातून तिने तिच्या आगामी म्युझिक व्हिडीओबद्दल सांगितले आहे.


संस्कृती बालगुडे हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिच्या ग्लॅमरस अदा पहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ संस्कृतीच्या आगामी म्युझिक व्हिडीओ धरला माझा हातच्या टीझरचा आहे. याशिवाय तिने या अल्बमच्या शूटवेळचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 


संस्कृती बालगुडेच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते आहे. धरला माझा हातच्या व्हिडीओची निर्मिती व्हिडीओ पॅलेसने केली आहे. 
'सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत.संस्कृती शेवटची 'सर्व लाइन व्यस्त आहेत' या चित्रपटात दिसली होती. लवकरच ती '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या सिनेमात दिसणार आहे.


संस्कृतीसह या सिनेमात अभिनेता शुभंकर तावडे,शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के अशी दमदार स्टारकास्ट आहे. अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते संगीत दिग्दर्शन करत आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sanskriti Balgude says - hold my hand, look glamorous in the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.