Sakhi gokhale wishes her husband suvrat joshi | सखी गोखलेने नवरा सुव्रत जोशीसोबतच्या सुंदर क्षणांचा व्हिडीओ शेअर करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

सखी गोखलेने नवरा सुव्रत जोशीसोबतच्या सुंदर क्षणांचा व्हिडीओ शेअर करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

'दिल दोस्ती दुनियादारी' ही मालिका रसिकांच्या मनात घर केले होते. यात सुव्रत जोशीने साकारलेल्या सुजय साठे ही भूमिका प्रेक्षकांना आवडली होती.अभिनेता सुव्रत जोशीने साकारलेला सुजय रसिकांना चांगलाच भावला. उत्तम अभिनेता असणारा सुव्रत या मालिकेनंतर दिल दोस्ती दोबारा आणि काही रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करतानाही दिसला. याशिवाय रंगभूमी आणि सिनेमातही त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. त्याच अमर फोटो स्टुडिओ हे नाटक ही चांगलंच गाजले होते.

सुव्रत आज आपला 36वा वाढदिवस साजरा करतो आहे. सुव्रतची पत्नी सखी गोखलेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुव्रत आणि तिच्या फोटोंचा एका व्हिडीओ शेअर केला आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पार्टनर, तू प्रत्येक गोष्ट परफेक्ट करतोस. अशा अशायाचे कॅप्शन सखीने या व्हिडीओला दिलं आहे. सेलिब्रेटी आणि चाहते सुव्रतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

 

2019ला सुव्रत जोशी आणि सखी गोखले पुण्यात विवाह बंधनात अडकले. अलीकडेच त्यांच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने सखीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. आनंदी दोन वर्षे कायदेशीर बंधन आणि एकत्रित सहा वर्ष सुव्रत जोशी. माझ्या मते प्रेम तिथेच आहे. पुस्तकाच्या पानांच्या पृष्ठभागावर दाबलेल्या विल्टेड गुलाबांमध्ये, मध्यरात्री निर्लज्जासारखी चॉकलेट्सचा डब्बा रिकामी करणे, रात्र होण्याआधी एकत्र डिशेस बनवणे आणि शांतपणे शेअर करणे. एकमेकांचे स्वातंत्र्य न हिरवता आपली भागीदारी आणखी बळकट केली. लव्ह यू सुव्रोमबस्की! इतक्या वर्षांतील रँडम फोटो. तेही. असं कॅप्शन तिने या फोटोसोबत दिले होते.

२०१५ साली दुनियादारी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या मालिकेच्या सेटवरच सुव्रत व सखीची ओळख झाली. या मालिकेत काम करत असतानाच सुव्रत व सखी यांच्यात प्रेमाचा अंकुर फुलले. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sakhi gokhale wishes her husband suvrat joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.