Sakhi Gokhale and Suvrat Joshi have been married for two years, the actress shared a special post on Instagram. | सखी गोखले आणि सुव्रत जोशीच्या लग्नाला झाली दोन वर्षे, अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर शेअर केली स्पेशल पोस्ट

सखी गोखले आणि सुव्रत जोशीच्या लग्नाला झाली दोन वर्षे, अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर शेअर केली स्पेशल पोस्ट

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांच्या लग्नाला नुकतीच दोन वर्षे झाली आहेत. सखी गोखलेने सोशल मीडियावर त्यांच्या या प्रवासातील फोटो कोलाज केलेला व्हिडीओ शेअर करत सुव्रतला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओत सखी आणि सुव्रतचे बरेच फोटो पहायला मिळत आहे आणि या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

सखी गोखलेने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आनंदी दोन वर्षे कायदेशीर बंधन आणि एकत्रित सहा वर्ष सुव्रत जोशी. माझ्या मते प्रेम तिथेच आहे. पुस्तकाच्या पानांच्या पृष्ठभागावर दाबलेल्या विल्टेड गुलाबांमध्ये, मध्यरात्री निर्लज्जासारखी चॉकलेट्सचा डब्बा रिकामी करणे, रात्र होण्याआधी एकत्र डिशेस बनवणे आणि शांतपणे शेअर करणे. एकमेकांचे स्वातंत्र्य न हिरवता आपली भागीदारी आणखी बळकट केली. लव्ह यू सुव्रोमबस्की! इतक्या वर्षांतील रँडम फोटो. तेही.

सखीच्या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. या फोटोतील केमिस्ट्री चाहत्यांना भावते आहे. सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांचा विवाह ११ एप्रिल, २०१९ला पुण्यात मोठ्या थाटामाटात पार पडला.  

सुव्रत आणि सखीच्या फॅन्सना त्यांचा फोटो प्रचंड आवडत असून त्या दोघांची जोडी खूपच क्यूट दिसत असल्याचे ते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. सखी-सुव्रत यांनी दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दोबारा या मालिकेद्वारे तर अमर फोटो स्टुडिओ या नाटकाद्वारे प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sakhi Gokhale and Suvrat Joshi have been married for two years, the actress shared a special post on Instagram.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.