सईचा अनारकलीमधील सोज्वळ लूक पाहून पडाल तिच्या प्रेमात, पहा तिचा हा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 06:30 AM2019-08-18T06:30:00+5:302019-08-18T06:30:00+5:30

अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते.

Sai Tamhankar's beautiful look in Anarkali, see this photo of her | सईचा अनारकलीमधील सोज्वळ लूक पाहून पडाल तिच्या प्रेमात, पहा तिचा हा फोटो

सईचा अनारकलीमधील सोज्वळ लूक पाहून पडाल तिच्या प्रेमात, पहा तिचा हा फोटो

googlenewsNext

मराठी सिनेइंडस्ट्री व बॉलिवूडमध्ये आपल्या स्टाईल व अभिनयानं रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, ती कुठे फिरतेय ही ती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असते. 


सईने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक सोज्वळ फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिचा एथनिक गेटअप पहायला मिळतोय. तिने अफव्हाईट रंगाचा अनारकली परिधान केला आहे. या फोटोत ती खूप सुंदर व सोज्वळ दिसत आहे. तिने हा फोटो शेअर करून सादगी असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या फोटोला खूप पसंती मिळते आहे. तसेच कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 


सईच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच वैभव तत्त्वादीसोबत 'पाँडेचेरी' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात सईसह वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी झळकणार आहेत. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग पाँडेचेरीमध्ये करण्यात आले आहे. सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून हा एक कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट आहे.


सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने दुनियादारी, बालक पालक, वजनदार यांसारख्या मराठी चित्रपटात तर हंटर, गजनी यांसारख्या हिंदी चित्रपटातही खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

तिने हिंदीमध्ये साकारलेल्या भूमिकांचे देखील तितकेच कौतुक झाले आहे. सईच्या अभिनयासाठी तिला आजवर अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. सईचा आगामी चित्रपट कधी भेटीस येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. 

Web Title: Sai Tamhankar's beautiful look in Anarkali, see this photo of her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.