‘नवरसा’ रिलीज; सई ताम्हणकरचं चाहत्यांना अनोखं सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 04:48 PM2021-08-06T16:48:20+5:302021-08-06T16:49:06+5:30

Navarasa : सई ताम्हणकर सध्या जाम चर्चेत आहे. होय, मराठी चित्रपटसृष्टीत तर तिचा दबदबा आहेच. पण आता बॉलिवूड आणि ओटीटीवरही सईची चर्चा आहे.

sai tamhankar starrer Navarasa Streaming netflix | ‘नवरसा’ रिलीज; सई ताम्हणकरचं चाहत्यांना अनोखं सरप्राईज

‘नवरसा’ रिलीज; सई ताम्हणकरचं चाहत्यांना अनोखं सरप्राईज

Next
ठळक मुद्दे‘नवरसा’मध्ये 40 वेगवेगळे कलाकार दिसणार आहेत. यात सुरिया, विजय सेतुपती, अरविंद स्वामी, प्रकाश राज, सरवानन, रेवती, नित्या मेनन, पार्वती तिरूवोतू, ऐश्वर्या राजेश यांचा समावेश आहे.

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या जाम चर्चेत आहे. होय, मराठी चित्रपटसृष्टीत तर तिचा दबदबा आहेच. पण आता बॉलिवूड आणि ओटीटीवरही सईची चर्चा आहे. ‘समांतर’ या वेबसीरिजनंतर नुकताच सईचा ‘मिमी’ हा बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित झाला आणि आता नेटफ्लिक्सवर तिची ‘नवरसा’ (Navarasa ) ही तामिळ सीरिज प्रदर्शित झालीये. दिग्गज दिग्दर्शक मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केली आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘नवरसा’चा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरने सोशल मीडियावर धूम केली होती. आता ही सीरिज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात सईचा एक वेगळा अवतार चाहत्यांना बघता येईल.


 
काय आहे ‘नवरसा’
‘नवरसा’ ही 9 वेगवेगळ्या कथांची एक मालिका आहे. राग, करूणा, धैर्य, द्वेष, भीती, आनंद, प्रेम, शांती आणि आश्चर्य अशा 9 भावभावनांवर अर्थात आयुष्यातील नऊ रसांचा आस्वाद प्रेक्षकांना या 9 वेगवेगळ्या कथांमधून घेता येणार आहे. यातल्याच एका कथेत सई ताम्हणकारची भूमिका असणार आहे.
  विशेष म्हणजे या प्रोजेक्टमधून होणारी कमाई मनोरंजन विश्वातील गरजू तंत्रज्ञ मंडळीना दिली जाणार आहे.

40 कलाकारांची फौज
‘नवरसा’मध्ये 40 वेगवेगळे कलाकार दिसणार आहेत. यात सुरिया, विजय सेतुपती, अरविंद स्वामी, प्रकाश राज, सरवानन, रेवती, नित्या मेनन, पार्वती तिरूवोतू, ऐश्वर्या राजेश यांचा समावेश आहे.

Web Title: sai tamhankar starrer Navarasa Streaming netflix

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app