आपल्या दिलखेच अदांनी महाराष्ट्रातील तमाम तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरची ओळख आहे. आपल्या अदा, स्टाईल, लूकमुळे सई चर्चेत असते. सई सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते. सई सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या नेहमीच संपर्कात असते. सईने नुकताच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोत सईसोबत अभिनेता वैभव तत्ववादी दिसतोय.  


सई आणि वैभवची जोडी ‘पाँडिचेरी’ या आगामी सिनेमात एकत्र दिसणार आहे. या सिनेमात सईसह वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी झळकणार आहेत. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग पाँडेचेरीमध्ये करण्यात आले आहे.

सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून हा एक कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट आहे.
सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

तिने दुनियादारी, बालक पालक, वजनदार यांसारख्या मराठी चित्रपटात तर हंटर, गजनी यांसारख्या हिंदी चित्रपटातही खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने हिंदीमध्ये साकारलेल्या भूमिकांचे देखील तितकेच कौतुक झाले आहे.

सईच्या अभिनयासाठी तिला आजवर अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. सईचा आगामी चित्रपट कधी भेटीस येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात.

Web Title: Sai tamhankar share photo with vaibhav tatwawaadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.