सई ताम्हणकर पडली प्रेमात, व्हिडीओ शेअर करत म्हणाली.....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 02:35 PM2021-09-17T14:35:10+5:302021-09-17T14:38:49+5:30

सेलिब्रिटींचं विश्व, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या मनातली गुपितं आणि बरंच काही जाणून घेण्याची रसिकांना इच्छा असते. त्याच्या आयुष्यात घडणा-या प्रत्येक ...

Sai Tamhankar In Love With Know Details | सई ताम्हणकर पडली प्रेमात, व्हिडीओ शेअर करत म्हणाली.....

सई ताम्हणकर पडली प्रेमात, व्हिडीओ शेअर करत म्हणाली.....

Next

सेलिब्रिटींचं विश्व, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या मनातली गुपितं आणि बरंच काही जाणून घेण्याची रसिकांना इच्छा असते. त्याच्या आयुष्यात घडणा-या प्रत्येक बाबींची माहिती रसिकांना हवी असते. हे सारं अनुभवण्याची संधी त्यांना सोशल मीडियामुळे मिळते. आवडत्या सेलिब्रेटींच्या आयुष्यात काय सुरु आहे. सध्या ते काय करत आहेत. सगळ्यांची उत्तरं सोशल मीडियावर मिळतातच.सोशल मीडियावर सई ताम्हणकरने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.


सई जे काही करते त्याचीच चर्चा होतेच.काही ना काही कारणामुळे ती चर्चेत असते. विशेष म्हजे मराठीच नाहीतर हिंदीतही तिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. तिच्या प्रत्येक भूमिकाही तितक्याच चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतात. अभिनयाव्यतिरिक्त ती आपल्या सौंदर्यानेही रसिकांना घायाळ करत असते. रसिकांची आवडती अभिनेत्री बनली आहे. सई ताम्हणकर मराठी रसिकांची दिलों की धडकन म्हणून ओळखली जाते.


आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. बोल्ड आणि बिनधास्त अशी सईची ओळख आहे.सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रीय असते. तिचे फोटो व्हिडीओ ती चाहत्यांसह शेअर करत असते. नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते तिचे कौतुक तर करत आहेत.


सई ताम्हणकरला त्याच साचेबद्ध कामात अडकून न राहता काही तरी हटके करायच्या शोधात असते. यामुळेच सई नव्या दिग्दर्शकांसोबतही काम करताना दिसतेय. प्रसिध्दीच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्री क्वचितच असे, एक्सप्रिमेन्ट करताना दिसत असतात, सई मात्र न कचरता नव्या दिग्दर्शकांना सपोर्ट करते. आपलं स्टारडमचं बॅगेज बाजूला ठेवून एखाद्या प्रोजेक्टला सामोरे जाण्यामध्ये सई विश्वास ठेवते.

जेव्हा जेव्हा ती फस्ट-टाईम दिग्दर्शकांसोबत काम करते. तेव्हा स्वत: पहिल्यांदा सिनेमात काम करत असल्याचा हुरूप सईच्या चेह-यावर नेहमी दिसतो. जिथे जिथे पहिली वेळ असते तिथे सई असतेच. नव्या फिल्ममेकर्सकडून तिला फिल्ममेकिंगचा नवा अॅप्रोच शिकायला खूप आवडतं. तिच्या याच दृष्टीकोनामूळे ती आज यशाच्या शिखरावर आहे.

Web Title: Sai Tamhankar In Love With Know Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app