सोशल मीडियाच्या माध्यमातून  सई ताम्हणकर नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सईने नुकतेच साडी परिधान केलेले  काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

या फोटोतील तिच्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे. यात तिने गुबाली रंगाची साडी परिधान केली आहे.  फॅन्सनाही साडीमधला तिचा  हा अंदाज आवडला आहे. त्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. 

 

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.  सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.

 

त्यामुळे सोशल मीडियावर नेहमीच सईचा बोलबाला असतो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत सई तितकीच सजग आहे. ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला अधिक प्राधान्य देते. हटके स्टाईल आणि फॅशनमधील स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

करिअरच्या सुरूवातीला अशी दिसायची मराठीची ही सुपर हॉट अभिनेत्री, काळानुसार झाला तिच्यात कमालीचा बदल


सईचे सोशल मीडियावरील तिचे जुने फोटो फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. व्हायरल होणारे जुने फोटो आणि तिचे सध्याचे फोटोंमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. स्वतःमध्ये कमालीचा बदल केल्याचे तिच्या जुन्या आणि आताच्या फोटोवरुन सहज कळेल.कारण आता दिसणारी सई आणि पूर्वीची सई यांच्यात जमीन आस्मानाचा फरक होता.

याशिवाय वर्कआऊट आणि जीवनातील काही गोष्टी शिस्तीने फॉलो केल्यानेच ती आज मराठीत दिलों की धडकन बनली आहे. सुंदर आणि फीट दिसणं यासाठी सईने खूप मेहनत घेतली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sai Tamhankar look stunning In Pink Saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.