तुळशीचं लग्न पार पडलं की साऱ्यांना वेध लागतात ते लगीन सराईचे. त्यामुळे येत्या काही दिवसात अनेक सेलिब्रेटीही लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात करताना दिसतील. आली लग्न घटिका समीप, करा हो लगीनघाई म्हणत अभिनेत्री सई लोकुरच्याही लग्नासाठी काऊंटडाऊन सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सई लोकुर तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. येत्या ३० नोव्हेंबरला तीर्थदीप रॉयसह सई लोकुर लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात करणार आहे. सईने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लग्नापूर्वी केल्या जाणा-या गृहमुख पूजेची फोटो शेअर केली आहेत.

सई लोकुर सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. लग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या सगळ्या घडामोडी ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. प्रत्येक मुलीसाठी लग्न हा तिच्या आयुष्यातला मेगा एव्हेंट असतो.

लग्नानंतर आयुष्यात येणा-या जोडीदारासह ती तिच्या आयुष्याची पुढील वाटचाल सुरू होते. तिचे अनेक चाहते या फोटोंना लाईक्स कमेंट करत येणा-या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. लग्नाला खूप कमी दिवस उरले आहेत. लग्नानंतर सईचा नवीन प्रवास सुरू होणार असल्यामुळे ती खूप उत्सुकही आहे.

काही महिन्यांपुर्वीच या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. सईने साखरपुड्याचे फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला होता. शेअर केलेल्या फोटोत दोघांनीही पिवळ्या रंगाचे आउटफिट घातले होते.

आपल्या जीवनातील या खास क्षणाला संस्मरणीय करायचे सईनेही ठरवले होते. त्यानुसार आपल्या जोडीदारासह काही खास क्षण कॅमे-यात कैद करुन प्री-वेडिंग फोटोही केले होते. यावेळी दोघांचा रोमँटीक अंदाज  घायाळ करणारा असाच होता.


अभिनेत्री सई लोकुर 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वात स्पर्धक होती. ती घरात शंभर दिवस राहून ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचली होती. या शोमधून ती घराघरात पोहचली. सईने तिच्या अभिनयातील कारकीर्दीची सुरूवात तिची आई वीणा लोकूर यांचे दिग्दर्शन असलेला चित्रपट मिशन चॅम्पियनमधून केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत मोहन जोशी मुख्य भूमिकेत होते.


२०१५ साली तिने 'किस किसको प्यार करूँ' या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन अब्बास मस्तान यांनी केले होते.  या चित्रपटात तिच्यासोबत कपिल शर्मा, सिमरन कौर मुंडी व एली अवराम मुख्य भूमिकेत होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sai Lokur Wedding Festivities Grahmukh Puja See Pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.