असा फोटो तुम्ही पाहिला नसेल त्यामुळे या फोटोत दिसणारी मुलगी आहे तरी कोण याची उत्सुकता नक्कीच असणार तर फोटोत दिसणारी महागुरू सचिन पिळगांवर यांची मुलगी श्रिया पिळगांवकर आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रिया आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. आपल्या जीवनातील विविध गोष्टी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी शेअर करते. 


तिच्या इन्स्टाग्राम पेजवर तिचे एक से बढकर एक फोटो तुम्ही पाहिले असतील. विविध अंदाजातील तिचे फोटोशूट रसिकांचे लक्ष वेधून घेत असतात. मात्र हा फोटो दिसताच काही क्षण तुम्हीही थांबाल आणि हसून हसून लोटपोट व्हाल अशीच काहीशी अवस्था श्रियाच्या चाहत्यांचीही होत आहे. कल्पनेपलिकडच्या या फोटोवर युजर्सनेही भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत.


'हाथी मेरे साथी'  सिनेमात कल्कीच्या जागी श्रियाची वर्णी लागली आहे. या सिनेमातून ती दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. या सिनेमात ती पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. हाथी मेरे साथी सिनेमात राणा दुग्गाबतीसोबत दिसणार आहे.

 

या सिनेमात काम करायला मजा येणार आहे आणि या सिनेमाचा विषय खूप चांगला आहे. माझ्यासाठी हा सिनेमा खूप खास असून पहिल्यांदाच मी त्रिभाषिक सिनेमात काम करणार आहे. या सिनेमातून तमीळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करते आहे.

Web Title: Sachin Pilgaonkar Daughter Shriya Pilgaonkar Unique Photo Catches Eyball Of Everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.