चर्चा तर होणारच , सायली संजीवने क्रिकेटरला केले क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर एका कमेंटमुळे चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 08:28 PM2021-05-05T20:28:42+5:302021-05-05T20:35:20+5:30

सायली संजीवचे कमेंटला रिप्लाय पाहून दोघांमध्ये नक्कीच मैत्रीपलीकडे नाते फुल असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Ruturaj Gaikwad Chennai Super Kings Comments On Sayali Sanjeev Photo | चर्चा तर होणारच , सायली संजीवने क्रिकेटरला केले क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर एका कमेंटमुळे चर्चेला उधाण

चर्चा तर होणारच , सायली संजीवने क्रिकेटरला केले क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर एका कमेंटमुळे चर्चेला उधाण

Next

क्रिकेटर ऋतुराज गायकवाडवर  कित्येक तरुणी फिदा आहेत. मात्र ऋतुराजला अभिनेत्री सायली संजीवने क्लीन बोल्ड केल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. त्याचे झाले असे की, सायली संजीव सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. विविध अंदाजातील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतो. नुकतेच पुन्हा एकदा सायली संजीवने तिच ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केला आणि या फोटोवर नेहमीप्रमाणे लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला. या सगळ्यांमध्ये एक ऋतुराजच्या कमेंटने सा-यांचे लक्ष वेधून घेतले.

 

ऋतुजरानेही सायलीच्या फोटोंवर  "Woahh" अशी कमेंट केली होती. या कमेंटला सायलीने देखली खास रिप्लाय दिला. यावेळी सायलीने ऋतुराजच्या कमेंटवर केलेला रिप्लाय हा खास होता. कारण यांत तिने हार्ट इमोजी सेंड केलेले होते.

 

सायलीचे कमेंटला रिप्लाय पाहून दोघांमध्ये नक्कीच मैत्रीपलीकडे नाते फुल असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. सायली आणि ऋतुराज यांच्यात नेमकं काय सुरुय हेच जाणून घेण्याची उत्सुकता आता दोघांच्याही चाहत्यांना लागली आहे. 


छोट्या पडद्यावरील 'काहे दिया परदेस' ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती. तिचं वागणं, बोलणं आणि तिच्या भूमिकेतला साधेपणा रसिकांना विशेष भावला होता. या मालिकेतून प्रकाशझोतात आली. 'काहे दिया परदेस' या मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार एन्ट्री घेतल्यानंतर सायलीने तिचे लक्ष रुपेरी पडद्यावर केंद्रित केले आहे.  सिनेमांमध्येही सायली झळकली आहे. अभिनया इतकंच फिटनेसबाबत सायली अधिक सजग असते. फिटनेसवर बरंच लक्ष देते. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सना फिटनेसबाबत टीप्सही ती देते.

योगासनाद्वारे ती स्वतःला फिट ठेवते. विविध आसनं करत ती स्वतःला फिट ठेवते. असंच एक आसन करतानाचा सायलीचा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोत तिचे खाली डोकं वर पाय केलेत.

 

याचाच अर्थ ती शीर्षासन करत असतानाचा पाहायला मिळत आहे. हा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या फोटोला बरेच लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ruturaj Gaikwad Chennai Super Kings Comments On Sayali Sanjeev Photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app