मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या लग्नात जे काही केलं वाचून तुम्हालाही वाटेल कौतुकास्पद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 04:28 PM2021-05-08T16:28:18+5:302021-05-08T16:38:48+5:30

नुकतेच अभिनेत्री रुचिता जाधव देखील लग्नबंधनात अडकली आहे. उद्योगपती आनंद माने यांच्याशी ३ मे रोजी पाचगणी येथल्या फार्महाऊसमध्ये हा लग्नसोहळा पार पडला.

Ruchita Jadhav Cancelled Sangeet Ceremony donated 1500 packets of rice and dal among the needy in Panchgani | मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या लग्नात जे काही केलं वाचून तुम्हालाही वाटेल कौतुकास्पद

मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या लग्नात जे काही केलं वाचून तुम्हालाही वाटेल कौतुकास्पद

Next

करोना लॉकडाउनच्या काळात सर्व प्रकारचे  धार्मिक आणि लग्न सोहळ्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. लग्न सोहळा केवळ २५ लोकांच्या उपस्थितीत करण्याचे आदेश आहेत. त्यामुळं या काळात लग्न करायचे असेल तर जास्त नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कमीत कमी पाहुणे मंडळींमध्येच सध्या लग्नसमारंभ पार पडत आहेत. गेल्या काही महिन्यात अनेक मराठी सेलिब्रेटी लग्नबंधनात अडकले आहेत. कोरोनामुळे अनेक कलाकरांच्या लग्नाच्या तारखाही पुढे ढकलाव्या लागत होत्या. अखेर अनेकांनी कोरोना नियमांनुसारच लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. 


नुकतेच अभिनेत्री रुचिता जाधव देखील लग्नबंधनात अडकली आहे. उद्योगपती आनंद माने यांच्याशी ३ मे रोजी पाचगणी येथल्या फार्महाऊसमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. लग्नात कोरोनाचे नियमांचे उल्लंघन होणार नाही याबाबत काळजी घेण्यात आली होती. कमीत कमी पाहुणे मंडळी उपस्थितीत होते.

 

लग्नाचा जास्त गाजावाजा न करता हे लग्न पार पडले. या लग्नाचे खास वैशिष्ट म्हणजे. ठरवल्याप्रमाणे आधी संगीत कार्यक्रमही होणार होता. पण या कपलने त्यांचा संगीत कार्यक्रम रद्द करत  पाचगणीतल्या जवळच्या  गावांतील लोकांना दाळ आणि तांदळाची १५०० पाकिटांचे वाटप करत समाजिक बांधिलकी जपली.

रुचिताने लग्नाचे खास फोटोही चाहत्यांसह शेअर केले आहे. फोटो शेअर करताच या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लग्न ठरल्यापासून प्रत्येक गोष्ट रुचिता देखील सोशल मीडियावर शेअर करताना दिसली होती. लग्नात नववधू रुचिता अतिशय सुंदर दिसत होती.

 

समोर आलेल्या फोटोंमध्ये नववधू रुचिताचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे. नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती  शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ruchita Jadhav Cancelled Sangeet Ceremony donated 1500 packets of rice and dal among the needy in Panchgani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app