सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरचे नुकतेच पुण्यातील ढेपेवाड्यात लग्न पार पडले. या लग्नाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 
त्यानंतर आता नुकतेच मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकरने लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.


मिताली मयेकरने सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले की रॉयल कारभार.

तर सिद्धार्थ चांदेकरने फोटो शेअर करत म्हटले राजा आणि त्याची राणी.

सिद्धार्थ आणि मितालीच्या या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होताना दिसतो आहे. या फोटोत मितालीने लाल रंगाची साडी नेसली आहे आणि सिद्धार्थने बेज रंगाची शेरवानी परिधान केली होती. यात दोघे राजेशाही अंदाजात दिसत आहेत. 

पुण्यातील ढेपेवाडीत सिद्धार्थ व मितालीचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या लग्नसोहळ्यात मितालीने हिरव्या रंगाची नऊवारी नेसली होती. नाकात नथ, हातात हिरवा चुडा, माथ्यावर बाशिंग असा तिचा लूक होता.

तर सिद्धार्थने जांभळ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान केले होते. या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अभिनेता उमेश कामत, अभिज्ञा भावे, पूजा सावंत, भूषण प्रधान असे अनेक सेलिब्रिटी यावेळी हजर होते. 

लग्न ठरल्यापासून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट सिद्धार्थ व मिताली चाहत्यांसह शेअर करत आहेत. त्यांच्या हळदीचे, मेहंदीचे, संगीत सेरेमनीचे अनेक फोटो याआधीच व्हायरल झाले आहेत. या फोटोंमधील सिद्धार्थ आणि मितालीच्या केमिस्ट्रीची सगळीकडे चर्चा रंगली आहे.


दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Royal affairs of Siddharth Chandekar and Mithali Mayekar, photos pouring in comments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.