The role of the wife of 'Superstar' will fulfill the power of Kishori Shahane after the successful 'Queen' Kangana's mother. | बॉलिवूड ‘क्वीन’ कंगणाची आई साकारल्यानंतर किशोरी शहाणे-वीज साकारणार ‘या सुपरस्टार’च्या पत्नीची भूमिका

बॉलिवूड ‘क्वीन’ कंगणाची आई साकारल्यानंतर किशोरी शहाणे-वीज साकारणार ‘या सुपरस्टार’च्या पत्नीची भूमिका

काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगणा राणौतसह झळकलेल्या मराठमोळ्या अभिनेत्री किशोरी शहाणे-वीज पुन्हा एकदा हिंदी सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहेत.'सिमरन' या सिनेमात त्यांनी साकारलेली कंगणाची भूमिका रसिकांना भावली होती.आता पुन्हा एकदा अशाच वेगळ्या भूमिकेतून त्या रसिकांच्या भेटीला येणार आहेत. 'ब्लँक' या आगामी हिंदी सिनेमातून त्या रसिकांच्या भेटीला येणार असून यांत त्या अभिनेता सनी देओलच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहेत. बेहझाद खंबाटा हे या आगामी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.या सिनेमाची कथा, आणि सिनेमाचा आशय याबाबतची माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे.विविध मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये दर्जेदार भूमिका साकारत किशोरी शहाणे यांनी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवले आहे.शिवाय स्वतःचा फिटनेस कायम टिकून रहावा यासाठी त्या प्रचंड मेहनत घेत असतात. त्यांचं या वयातही फिटनेसबाबत सजग असणं आणि त्यांनी टिकवलेलं सौंदर्य याचं बॉलिवूडची क्वीन कंगणालाही अप्रूप वाटलं होतं. त्यामुळेच की काय आजही किशोरी शहाणे यांना चांगल्या दर्जेदार भूमिका ऑफर केल्या जात आहेत.'ब्लँक' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून सनी आणि किशोरी यांच्यात गप्पांची चांगलीच मैफलही रंगते.देओल आणि वीज कुटुंबीयांचा जुना संबंध आहे.किशोरी यांचे सासरे बलराज वीज यांनी पूर्वी बॉलिवूडचे हिमॅन धर्मेंद्रसोबत काही सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.त्यामुळे सनीपाजी आणि किशोरी यांच्या गप्पांमध्ये तो विषय आपसुकच ओघाने येतो.किशोरी शहाणे-वीज सध्या मराठी मालिका,सिनेमा आणि इतर काही हिंदी सिनेमांमध्येही भूमिका साकारत आहेत.

आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या मुलांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणं ही काही नवी गोष्ट नाही.अभिनय हा त्यांच्या रक्तातच असतो. त्यामुळे स्टार कलाकारांची मुलं आपल्या आईवडिलांप्रमाणेच रसिकांचं मनोरंजन करण्याच्या इराद्याने चित्रपटसृष्टीत दाखल होतात.काही महिन्यांपूर्वी विनोदाचे बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांचा लेक अभिनय यानं चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. आता लक्ष्मीकांत बेर्डे यांची एकेकाळची सहकारी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री किशोरी शहाणे यांचा मुलगा चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. 

Web Title: The role of the wife of 'Superstar' will fulfill the power of Kishori Shahane after the successful 'Queen' Kangana's mother.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.