बाबाच्या कडेवरच्या या चिमुकलीला ओळखलंत? आज आहे मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 05:39 PM2022-01-16T17:39:47+5:302022-01-16T17:41:38+5:30

Throwback: सध्या एका लोकप्रिय अभिनेत्रीचा एक थ्रोबॅक फोटो व्हायरल होतोय. चित्रपटात येण्यापूर्वी तिला कोणीही ओळखत नव्हतं. पण आज ती बॉडीगार्ड घेऊन फिरते...

rinku rajguru Throwback chilhood photo viral on social media | बाबाच्या कडेवरच्या या चिमुकलीला ओळखलंत? आज आहे मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री

बाबाच्या कडेवरच्या या चिमुकलीला ओळखलंत? आज आहे मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री

Next

कलाकारांचे थ्रोबॅक फोटो पाहण्यात वेगळीच मजा आहे. अनेकदा कलाकार बालपणीचे फोटो शेअर करतात आणि म्हणूनच ते क्षणात व्हायरल होतात. सध्या एका लोकप्रिय अभिनेत्रीचा एक थ्रोबॅक फोटो असाच व्हायरल होतोय.  सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोतील अभिनेत्रीनं अख्ख्या महाराष्ट्राला ‘याडं’ लावलं आहे. बाबांच्या कडेवरची ही चिमुकली आज एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. अद्यापही तुम्ही तिला ओळखू शकला नसाल तर आम्ही सांगतो. ही चिमुकली

 ही चिमुकली दुसरी कोणी नसून अभिनेत्री रिंकू राजगुरू  (Rinku Rajguru)  आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर हा फोटो शेअर केला होता. आता तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

चित्रपटात येण्यापूर्वी या रिंकूला कोणीही ओळखत नव्हतं. अगदी बाजूच्या गावातील लोकही तिला ओळखत नव्हते. पण आज हीच रिंकू बॉडीगार्ड घेऊन फिरते. महाराष्ट्र नाही तर अख्खा देश तिला ओळखतो.
‘सैराट; या एका सिनेमाने रिंकू एका रात्रीत स्टार झाली. ‘सैराट’साठी नागराज मंजुळेंना सोलापुरी मातीतील मुलगी हवी होती. त्यांनी अनेक मुली पाहिल्या, पण हिरोईन म्हणून कुणीही त्यांच्या पसंत पडत नव्हत्या.

एके दिवशी काही कामानिमित नागराज आणि टीम अकलुज गेले. तिथे एक बिनधास्त, निर्भीड, गावकरी भाषेत नडेल त्याला फोडणारी काळी सावळी निरागस मुलगी त्यांच्या नजरेस पडली. जसं पात्र होतं अगदी तशीच मुलगी होती. चौकशी केली. तेव्हा समजलं तिचं नाव रिंकू राजगुरू होतं. तिच्या घरच्यांशी बोलुन तिला आॅडिशनला बोलवण्यात आलं.

जेव्हा रिंकूला कळलं की आपल्याला कुणीतरी मंजुळे नावाचा दिग्दर्शक पिक्चर मध्ये घ्यायचा विचार करतोय, तेव्हा तिला खुप आनंद झाला. दिग्दर्शक म्हणजे कुणीतरी मोठा माणूस असणार. राहणीमान भारी असणार वगैरे वगैरे. अश्या अनेक कल्पना डोक्यात घेऊन रिंकू नागराज कडे ऑडिशनला गेली.
पण एक साधासुध्या कपड्यातला माणूस दिग्दर्शक म्हणून तिच्यापुढे उभा होता. रिंकूने ऑडिशन दिलं आणि ती सिलेक्टही झाली. यानंतर या रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आता ही रिंकू बॉलिवूडमध्येही पर्दापण करतेय. नागराज मंजुळे यांच्याच ‘झुंड’ या बॉलिवूडपटात ती दिसणार आहे. हिंदी वेबसीरिजमधून तिने वेबविश्वातही पर्दापण केलं आहे.

गेल्या काही वर्षांत रिंकू कमालीची बदलली आहे. अकलूजची ही पोरगी आता स्टार झालीये. लूक बदलला आणि आयुष्यही. ती आधीपेक्षा जास्त स्लिम आणि फिट झाली आहे.  

Web Title: rinku rajguru Throwback chilhood photo viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app