सध्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलेले असल्यामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटी देखील आपल्या घरातून बाहेर पडत नाहीयेत. सध्या चित्रपटांचे चित्रीकरण सुरू नाहीये. तसेच सगळे जीमदेखील बंद आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या घरात कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत.

सध्या सगळेच सेलिब्रेटी सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय झाले आहेत. रिंकू राजगुरुही सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. रिंकूने इन्स्टाग्रामवर चित्र काढतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रिंकू खुलपाखरांचे चित्र काढताना दिसतेय. चित्र काढून झाल्यावर रिंकू त्याचा फोटोही शेअर केला आहे. घरी रहा आणि मस्त मस्त चित्रं काढा असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे. रिंकूच्या फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या आधी ही रिंकू तिचा आईला स्वयंपाक करताना मदत करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. 

सैराट' सिनेमाने रिंकूला पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान पुरस्कार सारं काही दिलं. रसिकांनी तर भरभरुन प्रेम दिलंच, शिवाय राष्ट्रीय पुरस्कारातही रिंकूनं बाजी मारली. काही दिवसांपूर्वी रिंकूचा मेकअप हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमासाठी रिंकूने तब्बल ‘27 लाख रुपये घेतले होते. मानधनाची रक्कम पाहता रिंकू आज मराठीमधील सर्वाधिक महागडी अभिनेत्री बनली आहे.

Web Title: Rinku rajguru draw a cute picture of butterfly gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.