ठळक मुद्देरिंकू राजगुरूचे बालपण अकलूजमध्ये गेले असून शालेय जीवनात विविध कार्यक्रमांमध्ये रिंकूने सहभाग घेतला. यात गाणी किंवा नृत्याच्या कार्यक्रमाचा समावेश होता.

सैराट या पहिल्याच चित्रपटामुळे रिंकू राजगुरू स्टार बनली. तिला केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभर लोकप्रियता मिळाली. सैराट या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी देखील केले होते. रिंकूला एकाच चित्रपटामुळे प्रचंड स्टारडम मिळाले. तिच्या फॅन्सची संख्या प्रचंड आहे. सैराट या चित्रपटानंतर अनेक वर्षांनी तिचा कागर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या चित्रपटाला सैराट इतकी लोकप्रियता मिळाली नसली तरी या चित्रपटातील रिंकूच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.

 

रिंकू ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी अभिनेत्री असून तिच्याविषयी जाणून घ्यायला प्रेक्षकांना खूप आवडते. रिंकूला तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर तिचे फॅन्स मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. आज तिच्या बालपणीचे फोटो आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार असून या फोटोंमध्ये ती खूपच छान दिसत आहे. 

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सैराटमध्ये लक्षवेधी ठरली ती परशा आणि आर्चीची जोडी. सैराटमध्ये आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू तर भलतीच भाव खाऊन गेली. तिचा प्रत्येक डायलॉग,तिचं ट्रॅक्टर किंवा बुलेट चालवणं, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. त्यामुळेच सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली. सैराटमुळे तरुणाई जणू काही आर्ची नावाचा जप करू लागली. या सिनेमाने आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचं संपूर्ण आयुष्यच पालटलं. सैराटमध्ये ग्रामीण भागातली तरुणी साकारणाऱ्या रिंकूचा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली. आता तर रिंकूचा चांगलाच मेकओव्हर झाला असून स्टायलिश रिंकू प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 

रिंकू राजगुरूचे बालपण अकलूजमध्ये गेले असून शालेय जीवनात विविध कार्यक्रमांमध्ये रिंकूने सहभाग घेतला. यात गाणी किंवा नृत्याच्या कार्यक्रमाचा समावेश होता. रिंकू शाळेत असतानाच तिला सैराट हा चित्रपट मिळाला आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. आता तिचा मेकअप हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

Web Title: Rinku Rajguru childhood picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.