बॉलिवूडप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारदेखील सोशल मीडियावर सक्रीय असून ते त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल अपडेट देत असतात. मराठी अभिनेत्री रेशम टिपणीस देखील सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिच्या चाहत्यांना इंस्टाग्रामवरून अपडेट देत असते. रेशम सध्या  बर्मिंगहममध्ये एका मराठी चित्रपटाचं शूटिंग करते आहे आणि तेही ३ अंश सेल्सिअस डिग्रीमध्ये. ही माहिती खुद्द तिनेच फोटो शेअर करून इंस्टाग्रामवर दिली आहे.

रेशम टिपणीसने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पाच दिवसांपूर्वी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सिद्धार्थ जाधव सेल्फी घेताना दिसतो आहे. या फोटोत रेशम व सिद्धार्थसोबत अंकुश चौधरी व सयाजी शिंदे दिसत आहेत. हा फोटो शेअर करत रेशमने म्हटलंय की, नवीन काहीतरी येतंय.

त्यानंतर तिने लाल रंगाच्या वन पीसमधील एका फोटो शेअर करत लिहिलंय की, शॉट्समध्ये मिळालेल्या वेळेत मजा करताना.

एका दिग्दर्शकासोबत तिने फोटो शेअर करत म्हटलं की, तुमचा चांगला जुना फ्रेंड त्याचं दिग्दर्शन असलेल्या दुसरा चित्रपट आणि तुम्ही त्याचा एक भाग आहात हा अभिमानास्पद बाब आहे. प्रेम आणि शुभेच्छा परी.

रेशमने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये सगळी स्टारकास्टही पहायला मिळते आहे. यात सयाजी शिंदे, रेशम टिपणीस, वैदही परशुरामी, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी हे कलाकार या फोटोत दिसत आहे. 

रेशमने तिथल्या शूटिंगच्या वेळचा एक फोटो शेअर करत म्हटलं की, उफ्फ बर्मिंगहममध्ये तीन अंश सेल्सिअस डिग्रीमध्ये शूटिंग


रेशमने वैदेही सोबतचा फोटो शेअर करत म्हटलं की, कधीकधी तुम्ही एखाद्याला पहिल्यांदा भेटता आणि ते तुमच्यासोबत कायमस्वरूपी राहतात. लव यू प्रीटी फेस वैदेही.

रेशम टिपणीस, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, सयाजी शिंदे व वैदही परशुरामी हे कोणत्या सिनेमाचं शूटिंग करत आहेत, हे अद्याप समजू शकलेलं नाही.

Web Title: Resham Tipnis shooting at Birmingham in 3 degrees, she shared pictures with starcast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.