Recognize who is the Marathi actor.. getting different roles and get audience loves | ​ओळखा पाहू कोण आहे हा मराठीमधील अभिनेता...विविध भूमिकांतून मिळवतोय प्रेक्षकांचे प्रेम
​ओळखा पाहू कोण आहे हा मराठीमधील अभिनेता...विविध भूमिकांतून मिळवतोय प्रेक्षकांचे प्रेम

ठळक मुद्देअमेय वाघने तब्बल आठ वर्षानंतर पुन्हा केले 'संगीत संशयकल्लोळ' नाटकात काम अमेयने साकारली फाल्गुनरावांची भूमिका


अमेय वाघच्या 'संगीत संशयकल्लोळ' या संगीत नाटकाचा प्रयोग नुकताच पार पडला. तब्बल आठ वर्षानंतर त्याने 'संगीत संशयकल्लोळ' या नाटकात पुन्हा काम केले. या नाटकात त्याने फाल्गुनरावांची भूमिका साकारली होती. हे नाटकाच्या प्रयोगाचे फोटो व व्हिडिओ अमेयने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. या लूकमधील फोटो पाहून अमेय वाघ ओळखता येत नाही. 

अमेयने एका मुलाखतीत या संगीत नाटकांबद्दल सांगितले की, 'आठ वर्षांपूर्वीही मी संशयकल्लोळ नाटकात फाल्गुनरावांचीच भूमिका साकारली होती. संगीत नाटकांशी माझी ओळख झाली ती राहुल देशपांडेमुळे. या नाटकांची भाषा आणि संगीत फार वेगळे वाटले. अतिशय भावले. नाट्यसंगीत या प्रकाराशी नाते जुळले ते राहुलमुळेच. त्याच्या सहवासात संगीत नाटकात काम करण्याचा, त्या मंतरलेल्या वातावरणाचा जबरदस्त अनुभव घेता आला. ज्या मित्रामुळे हे सारे घडले त्याचे आयोजन असलेल्या या संगीतोत्सवात आठ वर्षांनंतर पुन्हा तीच भूमिका साकारण्याची संधी मिळाली, याचा फार आनंद वाटतो.'


अमेयने नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांची मने जिंकली आहेत. आता तो लवकरच हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. डिंग एण्टरटेंन्मेंट निर्मित आणि अनिरुद्ध सेन दिग्दर्शित 'असुरा' असे या वेबसीरिजचे नाव असून ही एक थ्रिलर गोष्ट आहे. विशेष म्हणजे, अमेयची यात महत्वपूर्ण भूमिका असून, तो पहिल्यांदाच अशा थ्रिलर वेबसिरीजमध्ये काम करताना दिसून येणार आहे. हिंदीच्या नावाजलेल्या कलाकारांचा समावेश असलेल्या या वेबसिरीजमध्ये बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीची प्रमुख भूमिका आहे. 'असुरा' या वेबसिरीजच्या निमित्ताने अर्शदसोबत काम करण्याची संधी अमेयला मिळणार असल्यामुळे तो देखील खूप उत्सुक आहे. 

Web Title: Recognize who is the Marathi actor.. getting different roles and get audience loves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.