'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी', 'व्हॉट्स अॅप लग्न' अशा सिनेमांमधून आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. रुपेरी पडद्यावर मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसह प्रार्थना बेहरेची केमिस्ट्री चांगलीच जुळली. मालिकांमध्येही तिच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. आजवर प्रार्थनाने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र चित्रपटांची निवड करताना प्रार्थना सध्या विचारपूर्वक निर्णय घेते. 


चित्रपटसृष्टीत एंट्री करताना वाट्याला आलेले चित्रपट तिने पटापट निवडले. यावेळी स्क्रीप्ट काय, दिग्दर्शक कोण, कलाकार कोण, भूमिका काय, निर्माता कोण असा विचार कधीच केला नसल्याचे प्रार्थनाने कबूल केले आहे. चित्रपटात नवनवीन करण्याच्या विचाराने तसं केल्याचंही ती सांगते. मात्र आता चित्रपटांची निवड करताना विचारपूर्वक निर्णय घेते असं प्रार्थनाने म्हटलं आहे. 

या कामात पतीही तितकीच मदत करतो असंही तिने सांगितले आहे. कुणी काही सांगितलं तरी जे पटतं तेच करते असंही तिने स्पष्ट केले आहे. शिवाय आपल्यासाठी चित्रपटात काम करणं हेच उपजीविकेचं साधन नाही, त्यामुळे ते कधीही नाकारू शकते असं सांगायलाही ती विसरली नाही. त्यामुळेच चित्रपटांची भारंभार निवड न करता योग्य त्या चित्रपटांची तसंच भूमिकांची निवड करत असल्याचे तिने म्हटले आहे.

Web Title: This is the reason why Prarthana Behere became Choosy...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.