For this Reason Marathi Movie ‘Zombivli’ Created A Lot Of Curiosity Among The Fans, Know Details | पहिल्यांदाच मराठी रूपेरी पडद्यावर अवतरणार झोंबीज, तर डोंबिवली आणि झोंबिवलीचे हे आहे खास कनेक्शन

पहिल्यांदाच मराठी रूपेरी पडद्यावर अवतरणार झोंबीज, तर डोंबिवली आणि झोंबिवलीचे हे आहे खास कनेक्शन

आगळ्या-वेगळ्या पध्दतीने मनोरंजन करण्यासाठी मराठीतला पहिला झॉम-कॉम सिनेमा ‘झोंबिवली’ पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. अ‍ॅक्शन, सीन्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना कथेशी खिळवून ठेवणारे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार हे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. आतापर्यंत आपण बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये झोंबिवर आधारित सिनेमे पाहिले आहेत. पण मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच झोंबिवर आधारित सिनेमा बनतोय. या सिनेमाचे शिर्षक इंटरेस्टिंग आहेत आणि 'डोंबिवली' मधील झोंबिज असे कनेक्शन असल्यामुळे सिनेमाचे नाव 'झोंबिवली' असे आहे. 

काही दिवसांपूर्वी,  हॉरर-कॉमेडी या जॉनरचा 'झोंबिवली' या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते आणि त्या ऑफिशिअल पोस्टरमुळे सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली. आपल्या मराठीत झोंबी पाहायला नक्कीच सर्वांना आवडेल आणि त्यांना पाहण्यासाठी उत्सुकता देखील वाढली असेल. आता प्रेक्षकांना झोंबीची छोटीशी झलक पाहायला मिळणार आहे कारण 'झोंबिवली' चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. 


मोशन पोस्टर हे सिनेमाप्रती उत्सुकता वाढवणार यात शंका नाही. झोंबींचे व्हिज्युअल, सुप्रसिध्द संगीतकार ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी दिलेले बॅकग्राऊंड म्युझिक, एकंदरीत मोशन पोस्टरचा इफेक्ट या सर्व गोष्टींसाठी प्रेक्षकवर्गांकडून पुन्हा एकदा चित्रपटाचे कौतुक होणार हे नक्की. सारेगम प्रस्तुत 'झोंबिवली' चित्रपटाची निर्मिती Yoodlee Films यांनी केली आहे. तर सुप्रसिध्द सिने दिग्दर्शक आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटात अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २०२१ ला प्रदर्शित होणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: For this Reason Marathi Movie ‘Zombivli’ Created A Lot Of Curiosity Among The Fans, Know Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.