राजगडावर जाताच भीती निघून गेली, चिन्मय मांडलेकरने ती वस्तू कायमची जतन केली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 05:46 PM2020-08-14T17:46:17+5:302020-08-14T17:48:50+5:30

'फत्तेशिकस्त' सिनेमामध्ये भरपूर ऍक्शन आहे, घोडेस्वारी आहे जी फर्जंदमध्ये नव्हती. त्यामुळे या सर्व गोष्टींची जोरदार तयारी करावी लागली.  सगळ्या गोष्टी खूपच आवाहनात्मक होत्या त्यामुळे त्याची मानसिक तयारी करावी लागली.

For This Reason Chinmay Mandlekar Shares Marathi Film Fatehshikast Experience | राजगडावर जाताच भीती निघून गेली, चिन्मय मांडलेकरने ती वस्तू कायमची जतन केली

राजगडावर जाताच भीती निघून गेली, चिन्मय मांडलेकरने ती वस्तू कायमची जतन केली

googlenewsNext

'फत्तेशिकस्त’ या चित्रपटात शिवरायांच्या गनिमी काव्याचा रुपेरी विस्तार अधिक व्यापक आणि प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट अशा पद्धतीने मांडणी केली आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळवून बॉक्सऑफिसवर देखील कामगिरी फत्ते केली. ‘फर्जंद’ या चित्रपटानंतर अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी 'फत्तेशीकस्त' या चित्रपटात देखील महाराजांची भूमिका त्याच सहजतेने आणि तडफदार बाण्याने रंगवली आहे. या भूमिकेसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. लवकरच छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे अविस्मरणीय किस्से सांगताना अभिनेता चिन्मय मांडलेकर सांगितले की, "फत्तेशिकस्त चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान खूप महत्वाच्या गोष्टी घडल्या. त्यातली अविस्मरणीय गोष्ट म्हणजे आम्ही  राजगड वर केलेलं शूटिंग. राज गडावर एक नेढे आहे, त्या नेढ्यात बसून आम्ही एक सीन केला होता. 

खूप उंचावर डोंगराच्या मधोमध आपोआप झालेलं एक भगदाड आहे ते. मला उंच ठिकाणांची भीती वाटते. पण आम्ही तिथे जेव्हा शूटिंग केलं तेव्हा माझी संपूर्ण भीती निघून गेली. हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. अजुन एक म्हणजे मोहिमेवर निघण्याआधी माझं एक भाषण आहे. ते दिग्पालने ऐनवेळी बदललं. आधीचं भाषण त्याला फारस आवडलं नव्हतं. त्याने नंतर लिहलेलं भाषण फारच सुंदर होतं. क्वचितच एखाद्या अभिनेत्याच्या वाट्याला इतकं सुंदर भाषण सिनेमामध्ये करण्याची संधी येते. त्याने ज्या कागदावर मला ते भाषण लिहून दिल  होतं त्यावर मी त्याची सही घेतली होती. अजूनही तो कागद मी जपून ठेवलेला आहे."

फत्तेशिकस्त सिनेमामध्ये भरपूर ऍक्शन आहे, घोडेस्वारी आहे जी फर्जंदमध्ये नव्हती. त्यामुळे या सर्व गोष्टींची जोरदार तयारी करावी लागली.  सगळ्या गोष्टी खूपच आवाहनात्मक होत्या त्यामुळे त्याची मानसिक तयारी करावी लागली. या नंतर  छत्रपती शिवाजी महाराजांकडे एवढे शूरवीर सरदार असताना एवढ्या जोखमीची मोहीम का केली? असा एक प्रश्न माझ्या पुढे उभा ठाकला होता. त्यामुळे भरपूर वाचन करावं लागलं. शामराव जोशी यांची यात खूप मदत झाली. शारीरिक व मानसिक, दोन्ही प्रकारची तयारी फत्तेशिकस्तच्या वेळेस करावी लागली. 

Web Title: For This Reason Chinmay Mandlekar Shares Marathi Film Fatehshikast Experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.