बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत असताना आता मराठी चित्रपटसृष्टीतही लग्नाची धामधूम पहायला मिळत आहे. यावर्षी रॅपर किंग जेडी उर्फ श्रेयश जाधव, अभिनेत्री स्मिता तांबे, अभिनेत्री नेहा गद्रे हे कलाकार लग्नबेडीत अडकले. या कलाकारानंतर येत्या काही दिवसांत आणखीन काही सेलिब्रेटी विवाहबंधनात अडकणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दुनियादारी मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता सुव्रत जोशी व अभिनेत्री सखी गोखले यांच्या अफेअरनंतर लग्नाची चर्चा जोरदार सुरू आहे. 

सुव्रत आणि सखी गोखले यांनी दुनियादारी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेतील त्यांच्या कामाचे खूप कौतूक झाले. त्यानंतर त्या दोघांचे सोशल मीडियावरील एकत्र फोटो किंवा कोणताही इव्हेंट किंवा कॉफी वा सिनेमाला एकत्र जाण्याचे फोटो पाहून ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांनी याबाबत स्वतः कधीच खुलासा केला नाही.

काही दिवसांपूर्वी सखीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत तिची स्पिनस्टर्स पार्टी असल्याचे समजते आहे. त्यात तिने वेस्टर्न आऊटफिटवर बॅचरल लिहिलेले रिबेन तिने परिधान केले आहे. या तिच्या फोटोवर शुभेच्छा व लाइक्सचा वर्षाव होत आहे.

त्यात आता सुव्रतनेदेखील इंस्टाग्राम स्टोरीतून त्याच्या लग्नाबाबत हिंट दिली आहे. आता हा फोटो काय असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना... या फोटोत सुव्रत दिसत नाही पण पंच पक्वानं पाहायला मिळत आहेत आणि त्यासोबत त्याने फोटोवर कॅप्शन दिले आहे 'केळवण २'.

आता या दोघांचे हे फोटो पाहून नक्कीच त्यांचा विवाह लवकरच पार पडणार असे चित्र दिसते आहे.

मात्र अद्याप त्या दोघांनीही याबाबत चुप्पी साधली आहे. त्यांचे चाहते त्या दोघांच्या लग्नाबाबत जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
 


Web Title: Really what? Sakhi Gokhale and Suvrat Joshi will soon get married in a wedding? After sukhartane suvarta gave the hint
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.