कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब अभिनेत्री रसिका सुनील हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. रसिकाने नुकताच बिकनीतील फोटो शेअर केला आहे. या फोटोने सोशल मी़डियावर खळबळ माजवली.रसिका सुनिल हिने प्रथमच हाॅट फोटोशूट केले आहे. रसिकाचा हा बाॅल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.

रसिकाने आपले हाॅट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. रसिकाच्या या बाॅल्ड फोटोंना चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. अवघ्या काही मिनिटांत सदर फोटोंना लाखो लाईक मिळाले आहेत.

रसिका सुनीलने छोट्या पडद्यावरील 'माझ्या नव-याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती.

शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली होती.

मालिकेत तिची निगेटीव्ह भूमिका असली तरी आपल्या खास अंदाजात तिने ही भूमिका साकारली होती. तिच्या भूमिेकला रसिकांचीही भरघोस पसंती मिळाली होती.

तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना चांगलाच भावला होता. मात्र पुढील शिक्षणासाठी शनाया अर्थात रसिकाने ही मालिका सोडली आणि ती अमेरिकेत गेली.

अमेरिकेत रसिका शिक्षणासोबत विविध गोष्टी करताना पहायला मिळते. ती सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना तिथले अपडेट्स देत असते.

नुकतेच तिने स्कुबा डायविंगचे प्रशिक्षण घेतले आणि तिला स्कुबा डायविंगचचे प्रमाणपत्र देखील मिळाले. त्यामुळे आता ती जगात कुठेही स्कुबा डाइव करू शकते.

स्कुबा डायविंगच्या कोर्सनंतर रसिकाला व्रेक डायविंग आणि नाईट डायविंगचेही प्रशिक्षण घ्यायचे आहे आणि ती लवकरच घेणार असल्याचे ती सांगते.


 

Web Title: Rasika Sunil's boldness ends! Photos hit social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.