लॉकडाऊनमध्ये या मराठी अभिनेत्रीने शेअर केला तिचा हॉट अँड बोल्ड फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 07:00 AM2020-04-03T07:00:00+5:302020-04-03T07:00:00+5:30

तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो.

Rasika sunil share her hot photo on instagram gda | लॉकडाऊनमध्ये या मराठी अभिनेत्रीने शेअर केला तिचा हॉट अँड बोल्ड फोटो

लॉकडाऊनमध्ये या मराठी अभिनेत्रीने शेअर केला तिचा हॉट अँड बोल्ड फोटो

googlenewsNext

कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब अभिनेत्री रसिका सुनील हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. रसिकाने वनपीसमधला  फोटो शेअर केला आहे. रसिका सुनीलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सिल्वर रंगाच्या हॉट ड्रेसमधला  फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसते आहे. या फोटोंवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे. त्यामुळे सामान्यपासून कलाकारांपर्यंत सगळ्यांनी स्वत:ला सेल्फ क्वारांटाईन करुन घेतले आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यामातून ते चाहत्यांच्या संपर्कात असतात. क्वारांटाईनमध्ये ते काय करतायेत याची माहिती ते सोशल मीडियावर देत असतात. 


रसिका सुनील बद्दल बोलायचे झाले तर  छोट्या पडद्यावरील 'माझ्या नव-याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती. शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. मालिकेत तिची निगेटीव्ह भूमिका असली तरी आपल्या खास अंदाजात तिने ही भूमिका साकारली होती. तिच्या भूमिेकला रसिकांचीही भरघोस पसंती मिळाली होती.

Web Title: Rasika sunil share her hot photo on instagram gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.