व्हॉट्सॲप माहित नाही असा माणूस भारतात शोधून सापडणार नाही. एक प्रकारे व्हॉट्सॲप आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. व्हॉट्सॲपवर आलेल्या मेसेजचा, स्मायलीचा किंवा इमोजीचा अर्थ आपण आपल्या सोयीने घेत असतो. बहुतांशवेळा त्यामुळे अनेक समज - गैरसमज निर्माण होतात आणि पुढे प्रसरण पावतात. व्हॉट्सॲप मुळे संवाद सहज शक्य झाल्याने प्रेमभावना व्यक्त करणही खुप सोपं झालंय. हिंदी आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेता राकेश बापट सध्या समाज माध्यमांमध्ये गाजत असलेल्या त्याच्या ‘व्हॉट्सॲप लव’ प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आहे. राकेश आणि अभिनेत्री अनुजा साठे ह्या दोघांमधील हेच ‘व्हॉट्सॲप लव’ प्रकरण नुकतंच जगजाहीर झालं आहे. म्हणजेच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 

व्हॉट्सॲप लव हे प्रकरण म्हणजे आजपासून प्रदर्शित होणारा एच.एम.जी एंटरटेनमेन्ट निर्मित आणि जम्पिंग टोमॅटो प्रस्तुत ‘व्हॉट्सॲप लव’ हा चित्रपट आहे. ह्या चित्रपटाची कथा ही जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या न त्या मार्गाने घडत आहे. सुखासिन आयुष्य जगणाऱ्या साध्या सरळ माणसाच्या आयुष्यात एका अनोळखी व्यक्तिकडून व्हॉट्सॲपवर आलेल्या मेसेजमुळे कसे बदल होत जातात आणि पुढे त्याचे रुपांतर कशात होते आणि परिणाम काय होतात? हे चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे.


संगीत ह्या सिनेमाचा आत्मा आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, जावेद अली, श्रेया घोषाल, पायल देव, सुफि गायक शबाब साबरी आदींनी स्वरसाज चढविला आहे.

अजिता काळे आणि साहिल सुल्तानपुरी यांनी शब्दबद्ध केलेल्या गीतांना नितीन शंकर य़ांनी संगीतबद्ध केले आहे.

कॉन्सर्ट किंग म्हणून संगीतविश्वात ओळखले जाणारे हेमंतकुमार महाले यांची कथा, दिग्दर्शन आणि निर्मिती असलेला तसेच अजिता काळे यांची पटकथा-संवाद असलेला ‘व्हॉट्सॲप लव’ ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर सुरेश सुवर्णा यांच्या कॅमेऱ्याने टीपला आहे. 


Web Title: Rakesh Bapat Movie What's up love released today
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.