जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यात भारतातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे सध्या देशात लॉकडाउन आहे. जरी सगळं बंद असलं तरी सोशल मीडियावर कलाकार एक्टीव्ह आहेत. आता क्वारंटाईनमध्ये अभिनेत्री रसिका सुनील हिने तिचा एक फोटो शेअर केला आहे.

कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब अभिनेत्री रसिका सुनील हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. रसिकाने नुकताच ग्रीन आऊटफिटमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूप बोल्ड दिसते आहे. तिचा हा किलर लूक तिच्या चाहत्यांना भावतो आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा व लाइक्सचा वर्षाव होतो आहे.


रसिका सोशल मीडियावर एक्टिव्ह आहे. ती इंस्टाग्रामवर नेहमी फोटो शेअर करत असते. बऱ्याचदा ती बोल्ड व ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेतही येते.


रसिका सुनीलने छोट्या पडद्यावरील 'माझ्या नव-याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती. शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली होती.मालिकेत तिची निगेटीव्ह भूमिका असली तरी आपल्या खास अंदाजात तिने ही भूमिका साकारली होती. तिच्या भूमिेकला रसिकांचीही भरघोस पसंती मिळाली होती.


तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना चांगलाच भावला होता. मात्र पुढील शिक्षणासाठी शनाया अर्थात रसिकाने ही मालिका सोडली आणि ती अमेरिकेत गेली.अमेरिकेत रसिका शिक्षणासोबत विविध गोष्टी करताना पहायला मिळते. ती सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना तिथले अपडेट्स देत असते.

नुकतेच तिने स्कुबा डायविंगचे प्रशिक्षण घेतले आणि तिला स्कुबा डायविंगचचे प्रमाणपत्र देखील मिळाले. त्यामुळे आता ती जगात कुठेही स्कुबा डाइव करू शकते.स्कुबा डायविंगच्या कोर्सनंतर रसिकाला व्रेक डायविंग आणि नाईट डायविंगचेही प्रशिक्षण घ्यायचे आहे आणि ती लवकरच घेणार असल्याचे ती सांगते.

Web Title: In Quarantine Rasika Sunil shared the killer look TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.