अभिनेता पुष्कर जोग बिग बॉस मराठी शोमध्ये झळकला. या शोचा उपविजेता ठरल्यापासून पुष्करला बऱ्याच ऑफर्स येऊ लागल्या आहेत. तो मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ती आणि ती या सिनेमात झळकला. या चित्रपटाचं बरंचसं चित्रीकरण लंडनमध्ये झालं होतं. या चित्रपटानंतर पुष्कर पुन्हा एकदा लंडनला रवाना झाला आहे. या ठिकाणी पुष्करच्या आणखी एका आगामी चित्रपटाचं चित्रीकरण होणार आहे. परदेशात मराठी चित्रपटाचं चित्रीकरण होणाऱ्या यादीत आम्ही असेच आहोत या चित्रपटाची भर पडली आहे.

या चित्रपटात अभिनेता पुष्कर जोग प्रमुख भूमिका साकारणार आहे. या मराठी चित्रपटासह पुष्कर एका हिंदी चित्रपटातही झळकणार आहे. “एकाच वेळी मराठी आणि हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनमध्ये असलेल्या मोजक्या मराठी कलाकारांपैकी एक आहे” अशी प्रतिक्रिया पुष्करने दिली आहे. शिवाय या चित्रपटात एक दिग्गज मराठी अभिनेत्री असून याबाबतची घोषणा लवकरच करण्यात येईल असंही पुष्करने सांगितले आहे.

चित्रपटाची निवड करताना दरवेळी काहीना काही हटके असेन किंवा वेवगवेगळे लोकेशन्स असतील याचा विचार प्राधान्याने करतो असं सांगताना मनाचा आवाजही तितकाच महत्त्वाचा असतो हे सांगायलाही पुष्कर विसरला नाही. निर्मात्यांना एखादं लोकेशन आवडलं असेन, त्यांना ते परवडत असेल आणि त्यामुळे चित्रपटाला त्याचा फायदा होणार असेल तर त्यांनी आवर्जून नवनवे लोकेशन्सबाबत विचार केला पाहिजे असंही पुष्कर म्हणाला. 


Web Title: Pushkar Jog went to London, know the reason
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.