मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता व बिग बॉस मराठी फेम अभिनेता पुष्कर जोग सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आपल्या प्रोजेक्टची अपडेट देत असतो. सध्या तो लंडनमध्ये एका चित्रपटाचे शूटिंग करतो आहे. ही माहिती खुद्द त्यानेच सोशल मीडियावर दिली आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाचं नाव आहे वेल डन बेबी.

पुष्कर जोगने इंस्टाग्रामवर लंडनमधील शूटिंगच्या दरम्यानचे फोटो शेअर केले आहेत.

वेल डन बेबी चित्रपटात पुष्कर जोगसोबत अभिनेत्री अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते मुख्य भूमिकेत आहेत. 


अभिनेता पुष्कर जोगबिग बॉस मराठी शोमध्ये झळकला. या शोच्या माध्यमातून पुष्कर घराघरात लोकप्रिय झाला. या शोचा उपविजेता ठरल्यापासून पुष्करला बऱ्याच ऑफर्स येऊ लागल्या आहेत.

तो मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ती आणि ती या सिनेमात झळकला. या चित्रपटानंतर आता तो वेल डन बेबी चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला गेला होता. या चित्रपटासह पुष्कर एका हिंदी चित्रपटातही झळकणार आहे.

“एकाच वेळी मराठी आणि हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनमध्ये असलेल्या मोजक्या मराठी कलाकारांपैकी एक आहे” अशी प्रतिक्रिया पुष्करने दिली आहे.

Web Title: Pushkar Jog is shooting in London with the cast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.