Priya marathe share new photo on social media | प्रिया मराठेचा हा फोटो पाहून तुम्हीही पडला तिच्या प्रेमात   
प्रिया मराठेचा हा फोटो पाहून तुम्हीही पडला तिच्या प्रेमात   

नाटक, सिनेमा आणि मालिका अशा विविध माध्यमांमधून प्रिया मराठे हे नाव घराघरात पोहोचले आहे. प्रियाने आपल्या अभिनयाच्या कौशल्याने रसिकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केले आहे. प्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर ती नेहमीट तिचे फोटो शेअर करत असते. नुकताच प्रियाने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत प्रियाच्या हातात मोरपंख दिसतेय. हे मोरपंख प्रियाने आपल्या चेहऱ्यावर फिरवताना दिसतेय. प्रियाचा हा फोटो तिच्या फॅन्सना आवडला आहे. त्यांनी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून त्यांनी ती दर्शवली आहे. 


प्रिया मराठे हिने छोट्या पडद्यावरील मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.‘या सुखांनो या’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर एंट्री मारली. यानंतर चार दिवस सासूचे या मालिकेत तिने काम केलं.

तू तिथे मी या मालिकेत तिने साकारलेली निगेटिव्ह भूमिका विशेष गाजली.याशिवाय कसम से या मालिकेतून तिथे हिंदी मालिकांमध्ये एंट्री मारली.मात्र 'पवित्र रिश्ता' मालिकेतील भूमिकेमुळे ती प्रत्येकाची लाडकी बनली.'बडे अच्छे लगते' है,कॉमेडी सर्कसमध्येही प्रिया झळकली. तिने 'साथ निभाना साथिया' या मालिकेतही एंट्री मारली. या मालिकेतही तिची निगेटिव्ह भूमिका होती.


Web Title: Priya marathe share new photo on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.