प्रिया बापटच्या 'त्या' फोटोची सोशल मीडियावर चर्चा, फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 07:15 AM2019-11-09T07:15:00+5:302019-11-09T07:15:00+5:30

'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रिया बापटने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

Priya bapat look gorgeous in black dress | प्रिया बापटच्या 'त्या' फोटोची सोशल मीडियावर चर्चा, फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा

प्रिया बापटच्या 'त्या' फोटोची सोशल मीडियावर चर्चा, फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा

googlenewsNext

'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रिया बापटने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. या सर्व चित्रपटांमध्ये प्रियाच्या अभिनयाचे प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही कौतुक केले. सिटी ऑफ ड्रीम्स'च्या माध्यमातून प्रिया डिजिटल माध्यमात देखील आपली छाप उमटवली आहे. 


अभिनेत्री प्रिया सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय नेहमी ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते. प्रियाने काही दिवसांपूर्वी काळ्या रंगाच्या ड्रेसमधला फोटो शेअर केला आहे. या सिंपल लूकमध्ये प्रिया खूपच सुंदर दिसतेय. तिच्या फॅन्सना देखील तिचा हा लूक आवडला आहे. 


प्रियाने चित्रपट, नाटक, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. नवा गडी नवं राज्य या नाटकात तसेच अधुरी एक कहानी, शुभंकरोती, दे धमाल, आभाळमाया यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिकांचे कौतुक झाले आहे.

काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. नागेश कुकुनूर यांनी या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे. या वेब सीरिजमध्ये काही बोल्ड सीन्स प्रियाने दिले आहेत.

Web Title: Priya bapat look gorgeous in black dress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.