कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने फोटोशूट केलं असून हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस व बोल्ड दिसते आहे. 

प्रार्थनाने तिच्या नव्या फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यात तिने ब्लॅक रंगाचा सेक्सी टॉप परिधान केला आहे. या फोटोत ती खूपच सेक्सी व बोल्ड दिसते आहे. प्रार्थनाने हा फोटो शेअर करीत म्हटलं की, माझे केस विस्कटलेले आहेत आणि माझे डोळे तेजस्वी आहेत. मला माहित आहे की वाइल्ड माझा आवडता रंग आहे. 


प्रार्थनाने या काळ्या रंगाच्या टॉप व्यतिरिक्त अफवाईट रंगाच्या शॉर्ट वन पीसमधील फोटो शेअर केलेत. त्यातही ती खूप सुंदर दिसतेय.


तसेच तिने अफवाईट रंगाच्या टॉपमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती विचारात मग्न असलेली दिसते आहे.


पिवळ्या रंगाचा गाऊनमध्ये ती ग्लॅमरस दिसते आहे. हे फोटोशूट एका गार्डनमध्ये केलेले दिसते आहे. 


पिवळ्या रंगाच्या टॉपमधील फोटो शेअर केला आहे. त्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

प्रार्थनाने केलेल्या नव्या फोटोशूटमुळे ती चर्चेत आली आहे.


प्रार्थना शेवटची 'ती अँड ती' चित्रपटात झळकली होती.

या चित्रपटात प्रार्थनासोबत पुष्कर जोगसोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत होते. 


Web Title: Prathana Behare's new photoshoot, See her bold and glamorous photos
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.