एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाने गाठला हा पल्ला, प्रशांत दामले यांनी मानले रसिकांचे आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 03:34 PM2021-03-02T15:34:24+5:302021-03-02T15:44:46+5:30

मराठी रंगभूमीवरील प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर ही सदाबहार जोडी आणि त्यांची ‘ऑनस्टेज’ केमिस्ट्री 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचं खरं वैशिष्ट्य आहे.

prashant damle and kavita lad's eka lagnachi pudhchi goshta will completed 400 shows soon | एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाने गाठला हा पल्ला, प्रशांत दामले यांनी मानले रसिकांचे आभार

एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाने गाठला हा पल्ला, प्रशांत दामले यांनी मानले रसिकांचे आभार

googlenewsNext
ठळक मुद्देरिपीट ऑडीयन्सने या नाटकाला खऱ्या अर्थानं आपल्या मनात स्थान दिलं आहे. 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकानं मिळवलेलं हे यश रसिकांनी आमच्यावर केलेल्या प्रेमाचं प्रतीक असल्याची भावना प्रशांत दामले यांनी व्यक्त केली आहे.

मराठी रंगभूमीला वाहून घेतलेले आजच्या पिढीतील नट असं ज्यांचं यथार्थ वर्णन प्रत्येक मराठी माणूस अभिमानाने करतो त्या प्रशांत दामलेंच्या 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या सदाबहार नाटकाची ४००व्या प्रयोगाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. एका लग्नाची ही खुमासदार आणि खुसखुशीत गोष्ट रसिकांनी इतकी डोक्यावर घेतली की, लॅाकडाऊननंतर पहिला प्रयोग 'हाऊसफुल्ल’ करत त्यांनी प्रशांत दामलेंवरील प्रेमाची जणू पोचपावतीच दिली. रसिक मायबापानं दिलेल्या याच प्रेमाच्या बळावर 'एका लग्नाची पुढची गोष्ट' हे नाटक ४०० प्रयोगांचा टप्पा गाठण्यात यशस्वी झालं आहे.

प्रशांत दामले फाऊंडेशन आणि गौरी थिएटर्स निर्मित, सरगम प्रकाशित, झी मराठी प्रस्तुत 'एका लग्नाची पुढची गोष्ट'च्या पुढील प्रयोगांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यात ६ मार्च ते १४ मार्चपर्यंत 'लग्नाळू आठवडा' म्हणून घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील विविध भागात या नाटकाचे प्रयोग केले जाणार आहेत. या सर्व प्रयोगांचं ऑनलाईन बुकिंग सध्या सुरू झालं आहे. ४०० व्या प्रयोगाला प्रमुख पाहुणे कोण? असं विचारता ते गुपित आहे पण तुमच्यासाठी सुखद धक्का असेल, असं दामले यांनी सांगितले.

🌺🌺🌺 🌺लग्नाळू आठवडा 🌺🌺🌺🌺 कुठे यायचं ते ठरवा आणि पटकन लिंक वर जा 🌹प्रयोग क्र 393🌹 ...

Posted by Prashant Damle on Monday, March 1, 2021

मराठी रंगभूमीवरील प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर ही सदाबहार जोडी आणि त्यांची ‘ऑनस्टेज’ केमिस्ट्री 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचं खरं वैशिष्ट्य आहे. रिपीट ऑडीयन्सने या नाटकाला खऱ्या अर्थानं आपल्या मनात स्थान दिलं आहे. 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकानं मिळवलेलं हे यश रसिकांनी आमच्यावर केलेल्या प्रेमाचं प्रतीक असल्याची भावना प्रशांत दामले यांनी व्यक्त केली आहे. लाँकडाऊननंतर जेव्हा या नाटकानं मराठी रंगभूमीचा पडदा उघडला तेव्हाही रसिकांनी मनापासून प्रेम करत गर्दी करणं ही या नाटकाची पुण्याई आहे. आज आम्ही ४०० व्या प्रयोगापर्यंत पोहोचलो आहोत. पुढे आणखी मोठी मजल मारायची आहे. तेव्हाही रसिकांची अशीच साथ मिळेल अशी आशाही दामले यांनी व्यक्त केली आहे. या नाटकाची कथा इम्तियाज पटेल यांनी लिहिली असून, संहिता व दिग्दर्शन अद्वैत दादरकरनं केलं आहे.

तुमच्या साथीने आम्ही चाललोय 400व्या प्रयोगाकडे.. 😍 बालगंधर्व रंगमंदिर - https://bit.ly/3d8OyiQ यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड - https://bit.ly/3rO8Ouf

Posted by Prashant Damle on Monday, February 15, 2021

Web Title: prashant damle and kavita lad's eka lagnachi pudhchi goshta will completed 400 shows soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.