कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. गेल्या काही दिवसांपासून प्रार्थना सिनेमांपासून दूर आहे. यावर टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना प्रार्थना म्हणाली, ''जेव्हा तुम्ही या इंडस्ट्रीत नवीन असता तेव्हा तुम्हाला सगळ्या भूमिका करायला हव्यात मी सुद्धा नवीन असताना वेगवेगळ्या जॉनरच्या सिनेमात काम केले.  ज्या स्क्रिप्ट माझ्याकडे यायच्या त्याना मी होकार द्यायचे.

करिअरची सुरुवातीला मी जो सिनेमा करतेय त्याचा दिग्दर्शक कोण आहे, निर्माता कोण आहे किंवा माझा को-स्टार कोण आहे हे प्रश्नच माझ्या डोक्यात यायचा नाही. जर मला सिनेमाची स्क्रिप्ट आवडली तर मी लगेच होकार द्यायचे. पुढे ती म्हणाली, आता मात्र मी सिनेमाची निवड करताना माझ्या पतीच्या मदतीने अनेक गोष्टींचा विचार करते. तो मला सिनेमा निवडताना मदत करतो. मला सिनेमा निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे कदाचित त्याच्यामुळेच मी सिनेमांबाबत सिलेक्टिव्ह झाले आहे.'' 


प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. 'डब्बा एैस पैस', 'सॉल्ट आणि प्रेम' यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे.

प्रार्थनाने याआधी 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. मालिका आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केलीच आहे. प्रार्थना सोशल मीडियाच्या माध्यमातूनही फॅन्सच्या संपर्कात असते. 


Web Title: Prarthana behere's husband helps her in decision making regarding film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.