सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा मग सेलिब्रिटी प्रत्येकालाच निवांत एन्जॉय करायला आवडते. प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. प्रार्थनाला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात. प्रार्थनाने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. नव-याच्या हातात हात दिलेला हा रोमँटीक फोटो पाहून तुमचीही नजर हटणार नाही.  


फोटोत पती अभिषेकसह निवांत आणि सुखी क्षणांचा आनंद घेत असल्याचं यांत दिसत आहे. कामाच्या निमित्ताने कधीच निवांत असा वेळ मिळत नाही शूटिंगमधून मिळालेला मोकळ्या वेळात केलेली ही मजा मस्तीचा आनंद प्रार्थनाच्या चेहऱ्यावर साफ दिसत आहे. प्रार्थनाचे हे फोटो तिच्या फॅन्सना देखील चांगले आवडले आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोंवर फॅन्सनी केला आहे. 


प्रार्थनाचे लग्न अभिषेक जावकरसोबत झाले आहे.अभिषेक हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. 'डब्बा एैस पैस', 'सॉल्ट आणि प्रेम' यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे. 

Web Title: Prarthana Behere Glam Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.