बिकनीमध्ये मराठी अभिनेत्रीने केला योगा, सोशल मीडियावर झाली ट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 06:16 PM2021-06-21T18:16:50+5:302021-06-21T18:18:27+5:30

ही अभिनेत्री तिच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते.

Prajakta Shinde wear bikini while doing yoga, got trolled | बिकनीमध्ये मराठी अभिनेत्रीने केला योगा, सोशल मीडियावर झाली ट्रोल

बिकनीमध्ये मराठी अभिनेत्रीने केला योगा, सोशल मीडियावर झाली ट्रोल

Next
ठळक मुद्देतिने योगा करतानाचा एक फोटो पोस्ट केला असून त्यासोबत योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आज जगभरात २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा होतोय. याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री प्राजक्ता शिंदेने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. पण तिने बिकनीतील फोटो पोस्ट केल्याने सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात येत आहे.

प्राजक्ता ही तिच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. तिने योगा करतानाचा एक फोटो पोस्ट केला असून त्यासोबत योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. योगा करताना कपडे घालण्याची परवानगी नसते का असा प्रश्न एका नेटिझनने तिला विचारला आहे तसेच तुझे कपडे कुठे आहेत असे देखील काही जण तिला सोशल मीडियाद्वारे विचारत आहेत. 

प्राजक्ताला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले असले तरी काहींना तिला हा अंदाज आवडत आहे. तू खूपच हॉट दिसत असल्याचे काहीजण तिला सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. 

अभिनयाची आवड जपत मिळालेल्या संधीच सोनं करत युवा अभिनेत्री प्राजक्ता शिंदे सध्या चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू पाहात आहे. प्राजक्ता शिंदे लवकरच 'इमेल फिमेल’ चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. ती या चित्रपटात अत्यंत बोल्ड अंदाजात दिसणार असून या चित्रपटातील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. 'इमेल फिमेल’ हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्याआधीच प्राजक्ता चांगलीच फेमस झाली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवरील तिच्या बोल्ड फोटोची चांगलीच चर्चा रंगली होती. तसेच सोशल मीडियावरील तिचे बोल्ड फोटो नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. ती फक्त चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही तितकीच बोल्ड आणि सेक्सी आहे. प्राजक्ता इन्स्टाग्रामवर नेहमीच बोल्ड फोटोज शेअर करत असते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Prajakta Shinde wear bikini while doing yoga, got trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app
टॅग्स :Yogaयोग