आगामी ‘बोनस’ या चित्रपटातील नायक-नायिकेच्या अगदी वेगळ्या लुकमधील पोस्टर्स निर्मात्यांनी नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित केले असून त्यांना चित्रपट रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची नायिका पूजा सावंतच्या वाढदिवशी एका टॅगलाईनसह चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. यामध्ये पूजा कोळी वेशात असून ती त्यात अत्यंत सुंदर दिसली आहे. ‘जग एकच आहे आणि आपण सगळे त्या एकाच जगाचा भाग आहोत’ या चित्रपटातील टॅगलाइनसह हे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. 

‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’ आणि अर्जुन सिंग बरान व कार्तिक डी निशाणदार प्रस्तुत, गोविंद उभे, अनुपमा कराळे, कांचन पाटील व जीसिम्स निर्मित आणि सौरभ भावे दिग्दर्शित ‘बोनस’ हा चित्रपट येत्या २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. पोस्टर्समधील या कलाकारांच्या लुकला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे या चित्रपटामध्ये नेमके काय पहायला मिळणार याबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मराठीतील ग्लॅमरस कलाकार पूजा सावंत आणि गश्मीर महाजनी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असून ते पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. हा सिनेमा रंगीबेरंगी आणि सदाबहार अशा कोळीवाड्याच्या पार्श्वभूमीवर आकाराला येतो. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंत ‘बोनस’ चित्रपटात एक वेगळीच भूमिका साकारत आहे.


‘बोनस’ हा एका अशा मुलाचा आनंदप्रवास आहे की आपल्या वाट्याचे चांगले प्रसंग जगाबरोबर शेअर करताना त्याचे आयुष्य बदलून जाते आणि त्याच्या धारणाही संपूर्णपणे बदलून जातात. अशा या भावनिक चित्रपटातील नायकाच्या म्हणजे गश्मीर महाजनीच्या प्रेयसीची भूमिका पूजा सावंत साकारत आहे. आपण नेहमीच इच्छित असलेल्या कोणत्याही चांगल्या मित्रांसारखे या दोघांचे नाते आहे.


चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात युवा दिग्दर्शक सौरभ भावे याने केले आहे. त्यांची ओळख एक प्रख्यात कथा आणि पटकथालेखक म्हणून चित्रपटसृष्टीत आहे. त्यांनी कित्येक मराठी चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून त्यांत हापूस, ताऱ्यांचे बेट, हृदयांतर, चुंबक आदी चित्रपटांचा समावेश आहे. 

 

Web Title: Pooja Sawant Got Special Surprise On Her Birthady

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.