The photo of Sonali Kulkarni in the Indo Western look went viral | सोनाली कुलकर्णीचा इंडो वेस्टर्न लूकमधला फोटो या कारणामुळे झाला व्हायरल

सोनाली कुलकर्णीचा इंडो वेस्टर्न लूकमधला फोटो या कारणामुळे झाला व्हायरल


कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉडर्न अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णी नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.  तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या सिनेमाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोनाली आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनबाबत नेहमीच जास्त सजग असते. नुकताच सोनालीने गुलाबी रंगाच्या साडीतला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. इन्डो वेस्टर्न साडीतले  हे फोटो असून तिच्या या लुकची सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.  हा लूक नेहमी प्रमाणे तिच्या फॅन्सना अधिक भावला आहे. या फोटोत सोनालीचे सौंदर्य आणखी खुलून गेले आहे. 


सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने 'बकुळा नामदेव घोटाळे' या सिनेमाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट सिनेमा दिले असून हिंदी सिनेमातही तिने काम केले आहे. 'नटरंग' या सिनेमातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते. तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या सिनेमांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. 'बकुळा नामदेव घोटाळे' या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते.

Web Title: The photo of Sonali Kulkarni in the Indo Western look went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.