‘क्लासमेटस्’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-2’, ‘तू तिथे असावे’ अशा सिनेमांतून दिसलेली ग्लॅमरस अभिनेत्री पल्लवी पाटीलने  ‘गोंद्या आला रे’च्या माध्यमातून वेबसीरिजच्या दुनियेतदेखील पदार्पण केले आहे. पल्लवी पाटीलने  ‘गोंद्या आला रे’ वेबसीरिजमध्ये दामोदर चापेकरांची पत्नी ‘दुर्गाबाई चापेकर’ या शूर महिलेची भूमिका साकारली होती. 

अभिनेत्री पल्लवी  सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. नुकताच पल्लवीने ब्लॉक अँड व्हाईटमध्ये साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.साडीत तिचं सौंदर्य खुललं आहे. पल्लवीचा हा फोटो तिच्या फॅन्सना देखील आवडला आहे. त्यांनी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून आपली पसंती दर्शवली आहे.   


काही महिन्यांपूर्वी पल्लवीने जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने हप्पीच्या आठवणींना उजाळा दिला होता.  पल्लवी हप्पीच्या आठवणी जागवताना म्हणाली होती, “तुंगभद्रा नदीच्या किनारी असलेली सुंदर शिल्पं, मंदिरे पाहताना, त्यांच्यावर केलेलं कोरीव काम बघताना आपल्या प्राचीन संस्कृतीची, कलासौन्दार्याची प्रचीती येते.

. हप्पीमध्ये भटकंती करताना प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा असलेल्या ह्या हप्पीच्या सौंदर्याच्या आपण प्रेमात पडतो.” पल्लवी अंकुश चौधरी, शिवानी सुर्वेसोबत ट्रिपल सीट सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

Web Title: Pallavi patil share her new photo on instagram

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.