'क्लासमेटस्’, 'शेंटीमेंटल', 'सविता दामोदर परांजपे', 'बॉइज-2', 'तू तिथे असावे' अशा सिनेमांतून दिसलेली ग्लॅमरस अभिनेत्री पल्लवी पाटीलने ‘गोंद्या आला रे’च्या माध्यमातून वेबसीरिजच्या दुनियेतदेखील पदार्पण केले आहे.


अभिनेत्री पल्लवी सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. नुकताच पल्लवीने तिचा ग्लॅमरस लूकमधील फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोतील पल्लवीचा अंदाज तिच्या चाहत्यांना आवडला आहे. फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोंवर होतो आहे.


पल्लवी पाटीलने ‘गोंद्या आला रे’ वेबसीरिजमध्ये दामोदर चापेकरांची पत्नी ‘दुर्गाबाई चापेकर’ या शूर महिलेची भूमिका साकारली होती. काही महिन्यांपूर्वी पल्लवीने जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने हप्पीच्या आठवणींना उजाळा दिला होता.

पल्लवी हप्पीच्या आठवणी जागवताना म्हणाली होती, “तुंगभद्रा नदीच्या किनारी असलेली सुंदर शिल्पं, मंदिरे पाहताना, त्यांच्यावर केलेलं कोरीव काम बघताना आपल्या प्राचीन संस्कृतीची, कलासौन्दार्याची प्रचीती येते. काही दिवसांपूर्वीच पल्लवी, अंकुश चौधरी, शिवानी सुर्वेसोबत ट्रिपल सीट सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Web Title: Pallavi joshi shares her glamorous photoshoot on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.