Hotness Overloaded...! या मराठी अभिनेत्रीनं चक्क सोशल मीडियावर केलं क्लीवेज शोऑफ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 06:30 AM2019-10-02T06:30:00+5:302019-10-02T06:30:00+5:30

या मराठी अभिनेत्रीनं क्लीवेज शोऑफ करणारा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

OMG ...! Marathi actress Amruta Khanvilkar has done a cleavage showoff on social media | Hotness Overloaded...! या मराठी अभिनेत्रीनं चक्क सोशल मीडियावर केलं क्लीवेज शोऑफ

Hotness Overloaded...! या मराठी अभिनेत्रीनं चक्क सोशल मीडियावर केलं क्लीवेज शोऑफ

googlenewsNext

अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकरने मराठी व हिंदी चित्रपटातील आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांवर चांगलीच भुरळ पाडली आहे. राझी व सत्यमेव जयते या हिंदी चित्रपटात काम केल्यानंतर आता अमृता मलंग या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरूवात केली आहे. 


अमृता सोशल मीडियावर सक्रीय असून ती सतत फोटो शेअर करत असते. इतकेच नाही तर ती संवादही साधत असते. अमृताने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचे क्लीवेज दिसत असून या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे. 

अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा आहेत.  मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शो ‘नच बलिये’चे विजेतेपदसुद्धा पटकावलं होतं. तसेच अमृता ‘खतरों के खिलाडी 10'मध्ये दिसणार आहे.  

लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन कुंडलकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. कुंडलकर आणि तेजस मोडकने या सिनेमाची कथा लिहली आहे. या सिनेमाची कथा नेमकी काय हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र सिनेमाची तगडी स्टारकास्ट रसिकांना आकर्षित करेल.

कारण यात अमृता खानविलकरसह सई ताम्हणकर आणि वैभव तत्तववादी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 
 

Web Title: OMG ...! Marathi actress Amruta Khanvilkar has done a cleavage showoff on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.