सध्या जेमतेम सगळ्या गोष्टी अनलॉक झाल्यामुळे आपल्या आजूबाजूला "न्यू नॉर्मल" चं दृश्य दिसत आहे. मराठी सिनेसृष्टीही हळूहळू अनलॉक होत असून महाराष्ट्रातील अनेक शूटिंग लोकेशनवर मराठी चित्रपटांचे तसेच मालिकांचे चित्रीकरण आपल्याला दिसत आहेत. मराठी कलाकारांनी अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या कामाला सुरुवात केली. आगामी मराठी चित्रपट "मराठी पाऊल पडते पुढे" याचे चित्रीकरण नुकतेच संपन्न झाले.  चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी निर्माते आणि कलाकार अशा सर्वानी एक अनोखा खेळ खेळत या चित्रीकरणाची सांगता केली.

आपल्या सेटवरचे शूटिंगदरम्यान थोडे तणावाचे झालेले वातावरण कमी करण्यासाठी फावल्या वेळेत एक खेळ खेळायचा असे चित्रपट निर्माते आणि प्रसिद्ध मराठी उद्योजक प्रकाश बाविस्कर यांनी ठरवले. लहानपणी जस आपण मुलांची चपळता अजून वाढावी म्हणून "आरसा - टेलीफोन" हा रंजक खेळ खेळायचो ज्यात जितक्या जलद समोरचा आदेश देईल तितक्याच चपळतेने त्याचा आदेशाचा अभिनय करायचा, अगदी त्याचप्रमाणे निर्माते प्रकाश बाविस्करांनी "मास्क-सॅनिटायझर" हा वेगळा खेळ सेटवर खेळण्याचे सुचवले आणि सर्व कलाकारांनी या खेळाला पसंतीसुद्धा दर्शवली.  

 

हा खेळ खेळल्यानंतर आपल्याला पुन्हा उल्हासाने काम करण्याची चेतना मिळेल तसेच यातुन समाजप्रबोधनदेखील होईल हा त्यामागील त्यांचा उद्देश होता. खेळात चित्रपटाचे निर्माते प्रकाश बाविस्कर हे सर्व कलाकारांना मास्क आणि सॅनिटायझर वापरण्याचा अभिनय करायाला सांगत आहे आणि अभिनेता चिराग पाटील, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, अभिनेते संजय कुलकर्णी आणि अभिनेते सतीश सलागरे हे त्यांच्या आदेशाचे पालन करत तो अभिनय करत आहे हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. खेळीमेळीचे वातावरण राखत या कोरोनाकाळात आपण आपल्या प्रियजनांची काळजी घ्यावी हे या खेळामागचे उद्देश आहे.

 

मराठी माणसाने व्यवसाय क्षेत्रात उतरत आपली नवी ओळख बनवावी ही या चित्रपटाची कहाणी आहे. निर्माते प्रकाश बाविस्कर हे स्वतः यशस्वी मराठी उद्योजक असून चित्रपट निर्माते म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट आहे तसेच अकात डिस्ट्रिब्युशनचे चंद्रकांत विसपुते हे चित्रपटाचे सहनिर्माते असून स्वप्नील मयेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

 

भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे चिरंजीव अभिनेता "चिराग पाटील" जे बहुचर्चित बॉलिवूड सिनेमा ८३ या मध्ये खुद्द क्रिकेटपटू संदीप पाटील यांची भूमिका बजावणार असून "मराठी पाऊल पडते पुढे" या चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी पाटणे आपल्याला चिरागसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे . जेष्ठ अभिनेते अनंत जोग हे या चित्रपटात खलभूमिका निभावत आहेत, अभिनेता संजय कुलकर्णी आणि अभिनेता सतीश सलागरे यांचीदेखील उल्लेखनीय भूमिका आहे. याचे चित्रीकरण सध्या संपले असून हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार ही माहिती अजून तरी गुलदस्त्यात आहे.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: New Normal again On Work All the Marathi Actors Enjoying Quality Time Chirag Patil Shared Photo From The Set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.