अभिनेत्री नेहा पेंडसे ५ जानेवारी, २०२०मध्ये बॉयफ्रेंड शार्दुल ब्याससोबत लग्नबेडीत अडकली. नेहाने लग्नात महाराष्ट्रीयन लूक केला होता. लग्नानंतर ती लगेच कामात व्यग्र झाली. त्यामुळे तिला हनीमूनवर जाण्यासाठी देखील वेळ नाही. ही गोष्ट खुद्द तिनेच सांगितली आहे.


खरेतर नेहा सध्या एका मराठी चित्रपटात काम करते आहे. त्यामुळे ती खूप बिझी आहे. तिने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटासोबत तिच्या हनीमून प्लानिंगबद्दल सांगितलं. नेहा म्हणाली की, मराठी चित्रपटानंतर आणखीन एका प्रोजेक्टचे काम सुरू होणार आहे. त्याचे शूटिंग बाकी आहे. काम संपल्यानंतर हनीमूनला जाणार आहे. हनीमूनसाठी जापानची निवड केली आहे. कामामुळे एप्रिलमध्ये बाहेर जाणार आहे.


लग्नानंतर काही दिवसांनी नेहाचा नवरा शार्दुल ब्यासच्या पहिल्या दोन लग्नाबद्दलचे वृत्त समोर आले. दोन घटस्फोट झाल्यानंतर शार्दुलने नेहासोबत लग्न केले. त्यानंतर सगळीकडे चर्चेला उधाण आलं. मग, नेहाने यावर प्रतिक्रिया दिली. तिने सांगितले की, तिला शार्दुलचे लग्न व मुलांसोबत काहीही प्रॉब्लेम नाही. 


लग्न मोडले हे आजच्या काळात नवीन नाही. करिअर बनवण्याच्या नादात त्याची दोन्ही लग्न मोडली, ही फार काही मोठी गोष्ट नाही. शादुर्लचा दोनदा घटस्फोट झाला असेल; पण मी सुद्धा काही व्हर्जिन नाही. दोनदा संसार मोडल्यानंतर त्याने माझ्याशी लग्न केलेय. याला हिंमत लागते. खरे तर यासाठी त्याचे कौतुक व्हायला हवे. आम्ही दोघांनीही एकमेकांच्या भूतकाळासह एकमेकांचा स्वीकार केला आहे, असे नेहा म्हणाली.


शादुर्लचे पहिले लग्न 10 वर्षांआधी मोडले. यानंतर पाच वर्षांआधी त्याचे दुसरे लग्नही तुटले. लग्न टिकली नाहीत पण शार्दुल एक चांगला पिता आहे. आपल्या मुलांवर तो प्रचंड प्रेम करतो, असेही नेहा म्हणाली.

शाार्दुलला भेटण्याआधी माझे 2-3 रिलेशिप झाले. मात्र ती नाती फार काळ टिकू शकली नाहीत. त्यानंतर मला शार्दुल भेटला. त्याच्या बद्दल सुरुवातीपासून सर्व माहित असूनही मी त्याच्यासोबत लग्न केले याचा मला आनंद आहे, असेही ती म्हणाली.

Web Title: Neha Pendse will not go on honeymoon after marriage, the reason for knowing this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.