नेहा पेंडसे बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मध्यंतरीच्या काळात ती रियालिटी शो बिग बॉसमध्ये बिझी होती. त्यामुळे आता नेहाच्या फॅन्सना तिने लवकरात लवकर रुपेरी पडद्यावर यावे अशी इच्छा आहे. नेहा सोशल मीडियावरही तितकीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. तसंच आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्ससह शेअर करते. नुकतंच नेहा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याचे तिने जाहिर केले आहे. ही गुड न्यूज शेअर केल्यानंतर तिच्या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. लग्नाच्या चर्चेत तिच्या अफेअरवरही चर्चा होत आहे. एनआरआय प्रियकरासोबत तिचे ब्रेकअप झाले होते. दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्रीही होती.

 

नेहाने लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णयदेखील घेतला होता. पण अखेरच्या क्षणी त्याने माघार घेतली. ती अभिनेत्री असल्याने नेहमीच तिच्या करियरला प्राधान्य देणार आणि त्यामुळे ती एक चांगली गृहिणी होऊ शकणार नाही असे त्याचे मत होते. त्यानंतर तिच्या प्रियकराने दुस-या मुलीसह लग्न केले. या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी तब्बल दीड वर्ष तिनं स्वतःला कामात झोकून दिले होते. पण आता पुन्हा एकदा नेहा पेंडसे एका व्यक्तिच्या प्रेमात पडली असल्याचे खुद्द नेहानेच सांगितले होते.

काही दिवसांपूर्वी शार्दुलसोबतचा फोटो शेअर करत, तिने ही बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. पण अनेकांनी हा फोटो पाहून नेहाच्या बॉयफ्रेन्डला ट्रोल करणे सुरु केले. याचे कारण म्हणजे, शार्दुलचे वजन. आता नेहाने या ट्रोलर्सला खरमरीत उत्तर दिले  होते. दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यानंतर मला शार्दुलच्या रूपात एक खरी व्यक्ती मिळाली. ट्रोलर्समुळे मी त्याला गमावू इच्छित नाही, असेही ती म्हणाली. लग्नाचा प्लॅनही तिने सांगितला. नवीन वर्षाच्या सुरूवातीला म्हणजेच 5 जानेवारी 2020 मध्ये ती शार्दुलसह आपल्या आयुष्याची नवी सुरूवात करणार आहे. नेहाचे लग्न पुण्यात होणार असून काही मित्र मैत्रिणी आणि कुटुंबिय या सोहळ्याला उपस्थित असतील.

Web Title:  Neha Pendse was hurt by the first breakup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.