आपल्या ग्लॅमरस आणि हॉट अंदाजमुळे ही अभिनेत्री मराठी सिनेइंडस्ट्रीत ओळखली जाते.  मात्र यावेळी नेहा पेंडसे ट्रेडिंशनल फोटो टाकून सगळ्यांच क्लीन बोल्ड केले आहे. मराठी सिनेइंडस्ट्री आपल्या स्टाईल व अभिनयानं रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री नेहाने सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.

नेहाने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक सोज्वळ फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिचा एथनिक गेटअप पहायला मिळतोय. तिने गुलाबी रंगाचा अनारकली परिधान केला आहे. या फोटोत ती खूप सुंदर व सोज्वळ दिसत आहे. 


काही दिवसांपूर्वी नेहाने  बॉयफ्रेंड शार्दुल सिंग बयास  रोमँटिक फोटो शेअर केला आहे आणि हार्टचं चिन्ह टाकलं होते. या फोटोवरुन नेहा लवकरच शार्दुल सिंग बयास या बिझनेसमनसोबत लग्नबेडीत अडकणार असल्याची चर्चा होती. 


नेहाने बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती एका मध्यवर्गीय कुटुंबातील आहे, तिचे वडील हे बिझनेसमन असून आई ही गृहिणी आहे. तिने अभिनयक्षेत्रात करियर करण्यामागे तिच्या आईचा मोठा हात होता.  नेहाने अनेक मराठी तसेच हिंदी मालिका, चित्रपट आणि रिअ‍ॅलिटी शोमधून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रात काम करण्याआधी तिने दक्षिण भारतीय चित्रपटांमधून देखील काम केलं होतं. 


Web Title: Neha pendse share her traditional photoshoot on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.